kidnapping case kidnapping case
जळगाव

फोनची रिंग वाजली;‌ हॅला बाबा..एकताच त्‍यांच्या पायाखालची जमीन सरकली

फोनची रिंग वाजली;‌ हॅला बाबा..एकताच त्‍यांच्या पायाखालची जमीन सरकली

सकाळ डिजिटल टीम

यावल (जळगाव) : येथील धोबीवाडा परिसरातील गेल्या दीड वर्षांपासून अपहृत (kidnapping case) असलेल्या तेरा वर्षांच्या मुलीचा उत्तरप्रदेशात (Uttar pradesh) शोध लागला असून, तिला घेऊन पोलिस यावलकडे येण्यासाठी निघाले आहेत. (bhusawal kidnapping case girl urttar pradesh police)

धोबीवाडा परिसरात राहणाऱ्या व मागील दीड वर्षांपूर्वी शाळेतून अपहरण करण्यात आलेल्या १३ वर्षीय मुलीच्या अपहरणाबाबत तक्रार दाखल होऊन तीनच दिवसांत उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात यावल पोलिसांना अखेर यश मिळाले आहे. या संदर्भात पोलिसात भिमसिंग कोळी यांनी आपल्या नातीचे (मुलीची मुलगी) १९ नोव्हेंबर २०१९ ला ती शिकत असलेल्या शाळेतून अज्ञात व्यक्तीने रिक्षात बसवून तिचे अपहरण केले असल्याची तक्रार दिली होती. याच काळात तिची आई आणि नात दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या मिळून आल्या नसल्याने निराश झालेल्या आजोबांनी त्या नातीचा व त्यांची मुलगी हिचा अखेर शोध थांबविला होता.

दीड वर्षानंतर नातीचा आवाज ऐकला

मात्र, दीड वर्षानंतर अचानक नातीचा २४ एप्रिलला पहाटे चारला आजोबांना फोन आला. आणि तिने आपण कुठे आहोत ही सर्व माहिती आजोबांना दिली. त्यानंतर भिमसिंग कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्या मुलीच्या शोधकार्यासाठी पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले आणि सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे या दोन सदस्यांच्या पथकास गोरखपूर (उतरप्रदेश) येथे पाठविले होते. या दोन्ही पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या तहसील बडहलगंज (जि. गोरखपूर) येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी बच्चा यादव, सुशीलकुमार यादव आणि गृहरक्षक दलाचे प्रदुमल कुमार यांच्या मदतीने त्या अपहरण करण्यात आलेल्या मुलीचा शोध लावण्यात यश मिळवले आहे. तिला त्यांनी ताब्यात घेतले आहे.

पण आईचा कोरोनात मृत्‍यू

तिची आई मनीषा किरण कोळी हिचा मात्र एक महिन्यापूर्वी बडलहगंज येथे रुग्णालयात उपचार घेत असताना कोरोनामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. येथील दोन्ही पोलिस कर्मचारी त्या मुलीला सोबत घेऊन यावल येथे येण्यासाठी रवाना झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France vs Senegal : किलियन एमबापेने मोडला मेस्सीचा विक्रम अन् नोंदवले २ वर्ल्ड रेकॉर्ड; मुंबईपेक्षा लहान देशाची फ्रान्सला कडवी टक्कर

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

SCROLL FOR NEXT