former MLA Santosh Chaudhary sakal
जळगाव

माजी आमदार संतोष चौधरींचा पोलिसांकडून शोध; या प्रकरणी पोलिसात गुन्‍हा

माजी आमदार संतोष चौधरींचा पोलिसांकडून शोध; या प्रकरणी पोलिसात गुन्‍हा

सकाळ डिजिटल टीम

भुसावळ (जळगाव) : शहरातील टिंबर मार्केट येथील सर्वोदय छात्रालय येथे करण्यात आलेल्या बेकायदा बांधकामाची पाहणी करण्यासाठी गलेले (Bhusawal palika) मुख्याधिकारी संदीप चिंद्रवार यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी आमदार संतोष चौधरी (former MLA santosh choudhary) यांच्यावर सोमवारी (ता. १४) रात्री उशिरा गुन्हा दाखल (Bhusawal police) करण्यात आला आहे. डिवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नियुक्त करण्यात आले असून, चौधरी यांचा शोध घेण्यात आला असता, ते मिळून आले नाही. (bhusawal-Police-search-former-MLA-Santosh-Chaudhary)

टिंबर मार्केटमधील सर्वोदय छात्रालयाच्या बेकायदा बांधकाम प्रकरणी सहाय्यक आयुक्त यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी माजी आमदार संतोष चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिस पथक चौधरी यांच्या शोधार्थ गेले असता, ते मिळून आले नाही. तसेच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, याठिकाणी सीसीटीव्ही आढळून आले. याचे फुटेज तपासून पुढील तपासाला गती मिळणार असल्याचे डिवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले.

सर्वोदय छात्रालयाच्या जागेवर अनाधिकृत बांधकाम

पालिकेचे नगररचनाकार भटु पवार, शुभम अडकर, अनिल भवर, चालक रमेश गुंजाळ यासह प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सर्वोदय छत्रालयाच्या इमारतीची पाहणी करताना माजी आमदार संतोष चौधरी हे देखील हजर होते. संतोष चौधरी यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करुन, कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या फिर्यादीवरून संतोष चौधरी यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश गोटला हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपाली चाकणकर यांना मोठा धक्का, सख्ख्या भावाचा निवडणुकीत दारुण पराभव

Kolhapur Gokul Milk Sangh : गोकुळ दूध संघावर प्रशासक की निवडणूक? अध्यक्ष नविद मुश्रीफांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीचा केला खुलासा

पहिल्या दिवसापासून सांगत होतो...; मस्साजोगच्या सरपंचपदाची निवडणूक जिंकल्यावर काय म्हणाले स्वरुपानंद देशमुख

Pune Crime: नारायणगाव बसस्थानकात धक्कादायक चोरी; महिलेच्या पर्समधून २० तोळे सोन्याचे दागिने लंपास, चोरट्यांची चलाखी!

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईदरम्यान तणावाची परिस्थिती

SCROLL FOR NEXT