भुसावळ (जळगाव) : तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत गुरुवारी (ता. २८) सकाळी अकराला पंचायत समिती सभागृहात जाहीर करण्यात आली. यात ओबीसी ११, सर्वसाधारण १४, अनुसूचित जाती आठ, तर अनुसूचित जमातीसाठी सहा ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण जाहीर झाले. यात महिला आणि पुरुष आरक्षण शुक्रवारी (ता. २९) जाहीर होणार आहे. या वेळी बहुतांश ग्रामपंचायतीत पूर्वीचेच आरक्षण रोटेशन लागल्याने इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली.
तालुक्यात नुकत्यात २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. मात्र, नवनियुक्त सदस्यांमधून सरपंचांची निवड होणार आहे. त्यामुळे सदस्यांमध्ये आरक्षणाबाबत उत्सुकता होती. तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमध्ये २०११ च्या जनगणनेसुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण या प्रवर्गनिहाय सरपंचपदाच्या आरक्षण सोडत गुरुवारी (ता. २८) तहसीलदार दीपक धीवरे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. पंचायत समितीच्या सभापती मनीषा पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे, गटविकास अधिकारी विलास भाटकर आदी उपस्थित होते.
आता सरपंच पदासाठी हालचालींना वेग
तालुक्यात चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अनेक नवख्यांना निवडणुकीत संधी मिळाली आहे. मात्र, अद्याप महिला सरपंच आरक्षण जाहीर न झाल्यामुळे इच्छुक असणाऱ्यांमध्ये आरक्षणाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर मात्र कोणाची लॉटरी लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शुक्रवारी (ता. २९) महिला आणि पुरुष आरक्षण सोडत जाहीर होताच सरपंचपदासाठी हालचालींना वेग येणार आहे.
गावनिहाय आरक्षण
अनुसूचित जाती प्रवर्ग- तळवेल, मोंढाळे, मन्यारखेडा, शिंदी, जाडगाव, कठोरे बुद्रुक, ओझरखेडा आणि साकरी. अनुसूचित जमाती- वराडसीम, जोगलखोरी, मांडवेदिगर, भिलवडी, साकेगाव, पिंपळगाव बुद्रुक आणि कंडारी, नागरिकांचा मागास प्रवर्ग- पिंप्रीसेकम, सुसरी, वांजोळे, जोगलखेडा, फुलगाव, फेकरी, कठोरा खुर्द, कन्हाळे बुद्रुक, कुर्हे प्र. न., पिंपळगाव खुर्द, काहूर खेडा. सर्वसाधारण- हतनूर, अंजनसोंडा, गोजोरा, बेलव्हाय, कन्हाळे खुर्द, सुनसगाव, टाहकडी, दर्यापूर, किन्ही, खंडाळे,आचेगाव, बोहर्डी बुद्रुक, खडके आणि चोरवड.
संपादन ः राजेश सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.