Bhusawal tapti school student krushna dhake sakal
जळगाव

‘कृष्णा’च्‍या उपग्रहाची दखल; ‘गिनीज बुक’कडून सन्मान

‘कृष्णा’च्‍या उपग्रहाची दखल; भुसावळच्या विद्यार्थ्याचा ‘गिनीज बुक’कडून सन्मान

सकाळ डिजिटल टीम

भुसावळ (जळगाव) : अंतराळात सोडलेल्या उपग्रहांमधून (Satellites launched into space) उत्कृष्ट उपग्रहाची दखल गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने (Guinness Book of record) घेतली आहे. यात, भुसावळच्या ताप्ती पब्लिक स्कूलचा दहावीचा विद्यार्थी कृष्णा ढाके (Bhusawal tapti school student krushna dhake) याने सोडलेल्या उपग्रहांचाही समावेश आहे. त्याबद्दल कृष्णा यास गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसह अशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या संशोधनामुळे भविष्यात विविध संशोधन करणाऱ्या संस्थेला भेट देण्याची मोठी संधी मिळू शकते. (jalgaon-bhusawal-tapti-school-student-honored-Satellites-Guinness-Book)

स्पेस झोन इंडियाच्या वतीने ७ फेब्रुवारी २०२० रोजी रामेश्वरम येथे अंतराळात लहान लहान असे छोटे छोटे १०० उपग्रह सोडण्याचा जागतिक विक्रम करण्यात आला. त्यात देशभरातील एक हजार व महाराष्ट्रातील ३८० विद्यार्थी सहभागी झाले होते. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच नागपुर व पुणे येथे एक दिवसाचे वर्कशॉप घेण्यात आले. यात कृष्णा ढाके याने सहभाग घेतला होता.

राष्ट्रीय अणि जागतिक पातळीवर पाच रिकॉर्ड

कृष्णा याने छोट छोटे फेम्टो सॅटॅलाइट बनवले होते. हेलियम बल्लूनच्या साह्याने १०० उपग्रह अंतराळात सोडण्यात आले. त्यांची कृषिविषयक शास्त्रीय अभ्यासाला उपयुक्त माहिती तसेच ओझोन वायूचा स्तर, रेडिएशन्सची माहिती, ग्लोबल वॉर्निंग व इतर विविध प्रकारच्या शास्त्रीय माहिती उपग्रहाद्वारे मिळाली. याची दखल घेत राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

अंतराळ क्षेत्रात करिअरची इच्छा

कृष्णा हा गण गण गणात बोते आयटीआयचे अध्यक्ष सतीश ढाके यांचा मुलगा आहे. भविष्यात या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याला विविध प्रकारची उपकरणे बनवून त्याच्या नोंदी घेण्याचा छंद आहे. त्याचे प्रिंसीपल निना कटलर यांनी कौतुक केले. यासाठी त्यांला ठाणे येथील प्रा. डॉ. मिलिंद चौधरी यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT