जळगाव

राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजपतर्फे उद्या चक्काजाम

राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजपतर्फे उद्या चक्काजाम; खासदार रक्षा खडसे यांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

सावदा (जळगाव) : भाजप प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी (ता. २४) मुंबई येथे झाली. बैठकीत राज्याचे आगामी होणारे अधिवेशन तसेच राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे रद्द करण्यात आलेले राजकीय आरक्षण या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस खासदार रक्षा खडसे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधींसह दूरचित्रवाणीद्वारे जळगाव येथे उपस्थित होत्या. या बैठकीनंतर खासदार खडसे व जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन शनिवारी (ता. २६) भाजपतर्फे राज्यभरात ‘चक्काजाम आंदोलन’ करण्यात येणार असल्याची माहिती दिली. (jalgaon-news-bjp-chakkajam-aandolan-maharashtra-state-goverment)

स्थानिक स्वराज्य संस्थांत ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी भाजप महाराष्ट्रतर्फे २६ जूनला राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येऊन याला जबाबदार राज्य सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. ओबीसींना परत आरक्षण मिळण्यासाठी न्यायालयात जाऊ तसेच आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका या वेळी घेण्यात आली. या वेळी ओबीसी समाजास पुन्हा राजकीय आरक्षण मिळण्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या चक्काजाम आंदोलनाविषयी खासदार रक्षा खडसे व जिल्हाध्यक्ष भोळे यांच्याकडून प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, डॉ. राजेंद्र फडके, किशोर काळकर, संघटनमंत्री रवी अनासपुरे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, पोपटतात्या भोळे, नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, हर्शल पाटील यांच्यासह सर्व भाजप तालुकाध्यक्ष, महिला आघाडी अध्यक्षा तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व भाजप प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT