girish mahajan
girish mahajan 
जळगाव

आगामी निवडणुका स्वबळावर लढणार : आमदार गिरीष महाजन

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका भारतीय जनता पक्ष Jalgaon bjp) हा स्वबळावर लढेल आणि जिंकेल देखील असा निर्धार आमदार गिरीश महाजन (Bjp leader girish mahajan) यांनी पक्षाच्या जिल्हा बैठकीत व्यक्त केला. (jalgaon-bjp-meet-and-girish-mahajan-statement-Upcoming elections-fought-on-one's-own)

भारतीय जनता पक्षाची बैठक आज वसंत स्मृती या भाजप जिल्‍हा कार्यालय झाली. बैठकीस महाराष्ट्राचे भाजप नेते आमदार गिरीष महाजन, जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, अनुसूचित जमाती संपर्क प्रमुख अॅड. किशोर काळकर, किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र संयोजक सुरेश धनके, किसान मोर्चा नारायण चौधरी उपस्थित होते.

माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले की, कोरोनाच्या महामारीत फक्त भाजपचेच पदाधिकारी कार्यकर्ते हे जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून काम करत होते. आगामी काळातले पक्षाचे कार्यक्रम हे बूथ स्तरापर्यंत राबवावे. मंडळाच्‍या या कार्यक्रमांना स्वतः उपस्थिती देणार आहेत असे म्हणाले. तसेच येणाऱ्या काळात जळगाव जिल्ह्यात सर्व नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी बूथ स्तरापर्यंत व जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ‘बळीराजा मार्गदर्शन व सहाय्यता केंद्र’ प्रकल्पा मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवायचे आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुक भाजप स्वबळावर जिंकू याचा संकल्प व निर्धार कार्यकर्त्यांच्या समवेत केला.

बळीराजा मार्गदर्शन– सहाय्यता केंद्राची स्‍थापना

बैठकीत स्व. हरिभाऊ जावळे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त ‘बळीराजा मार्गदर्शन व सहाय्यता केंद्राची’ स्थापना करण्यात आली. आमदार सुरेश भोळे यांनी बोलतांना सांगितले, की योजनेतून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी गावात एका फोनवर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता उपलब्ध होणार आहे. स्व. हरिभाऊ जावळे हे शेतकऱ्यासाठी चालते फिरते मदत केंद्रच होते. म्हणून त्यांना समर्पित अशी योजनेची सुरुवात करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT