mangesh chavan suresh bhole 
जळगाव

सरकारी भत्ता अन्‌ ‘मामांचा’ डबा..भोळे-चव्हाणांची भेट 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : महावितरण अभियंत्यास खुर्चीला बांधल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेल्या आमदार मंगेश चव्हाण यांनी पहिल्या दिवशी ‘सरकारी’ भोजन केल्यानंतर रविवारी मात्र आमदार सुरेश भोळेंनी त्यांची भेट घेतली व चव्हाणांनी त्यांचा डबा स्वीकारत भोजन केल्याचे वृत्त आहे. 
महावितरणाच्या अभियंत्याला खुर्चीत बांधल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकेतील आमदार मंगेश चव्हाण, यांना शनिवारी सरकारी जेवण मिळाले. पोलिस ठाण्याच्या कोठडीत आमदार महाशयांना इतर संशयित आरोपींना कोठडीत दिल्या जातात तशाच सुविधा आहेत. 

आमच्यासाठी कैदीच! 
एरवी हायप्रोफाइल व्यक्तींना व्हीआयपी सुविधा दिल्याचे ऐकण्यात, वाचण्यात येते. येथे मात्र कोठडीत आल्यावर भेदभाव न करता इतर संशयितांप्रमाणेच वागणूक होती. आपल्यासाठी गजांच्या त्या बाजूला असणारा कोणीही असो तो संशयित आरोपीच आहे. त्याच्यासाठी नोकरी कोण धोक्यात घालीन भो..., अशी चर्चा रात्री गार्ड कर्मचारी करत होते. 

मामांनी घेतली भेट 
जळगावचे आमदार सुरेश भोळे यांनी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान कोठडीतील आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेतली. आमदारांच्या वैद्यकीय तपासणीनंतर लॉकअपसमोरील गार्डरूममध्ये मामांनी आणलेल्या डब्यातून आमदारांनी जेवण केल्याचे सांगण्यात आले. या भेटीनंतर स्वतः जेवणाला निघताना निरीक्षक प्रताप शिकारे यांनी ठाणे अंमलदार व गार्ड कर्मचाऱ्यांना कोठडीच्या नियमावलीने कान फुंकले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT