corona death
corona death corona death
जळगाव

अखेर मृतदेह नातेवाईकांनीच नेले स्मशानभूमीत; बाधित मृतदेह पाच तास पडून

अमोल अमोदकर

बोदवड (जळगाव) : शहरात कोरोना कहर वाढत असून, अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. यात काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाबाधित व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याच्यावर कोरोनाच्या नियमानुसार अंत्यसंस्कार करणे गरजेचे असताना कर्मचारी व अधिकारी यांच्या वादामुळे शनिवारी (ता. १७) तिघांच्या मृतदेहाची हेळसांड झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वेळेवर कर्मचारी उपलब्ध न झाल्याने एकावर उशिरा तर दोन मृत रुग्णांना नातेवाईकांनीच स्मशानभूमीत नेत अंत्यसंस्कार केले.

येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, या ठिकाणी उपचारादरम्यान मृत झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्काराची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांवर सोपवली आहे. त्यानुसार शनिवारी (ता. १७) तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, मृत व्यक्तींचे मृतदेह नियमानुसार प्लास्टिक कीटमध्ये पॅक करून त्यांचा अंत्यविधी करण्याची जबाबदारी नगरपंचायत सफाई कामगारांवर आहे. मात्र, आमच्याकडे फक्त अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी आहे.

मृतदेह किटमध्ये पॅक करण्यावरून वाद

मृतदेह प्लास्टिक कीटमध्ये पॅक कारण्याची जबाबदारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची असल्याचे म्हणत याठिकाणी वाद निर्माण झाला. यात सफाई कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नगरपंचायत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची सुविधा पुरविण्यात आली नसतानाही आम्ही जीव धोक्यात घालून काम करीत आहे. त्यातच पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी ग्रामीण रुग्णालयात शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप सफाई कर्मचाऱ्यांनी करत नगरपंचायत प्रशासनास निवेदन देत पोलिस निरीक्षक यांचा निषेध नोंदवला आहे. तर सफाई कर्मचारी हे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यविधी करण्यास विनाकारण विलंब लावता आहे. त्यामुळे मृतदेह पडून असल्याचे ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी मला सांगितले असता याबाबत विचारणा केली असता त्यांनी वाद घातला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. असे असले तरी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वादामुळे मृतदेहाची अवहेलना या वेळी बघावयास मिळाली.

तीन, चार तास मृतदेह पडून

पोलिस निरीक्षक यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचे म्हणत नगरपंचायत सफाई कामगार मृतावर अंत्यसंस्कार न करता निघून गेले. त्यामुळे बोदवड येथील मृत शालिग्राम चौधरी व रावेर येथील मृत कोरोनाबाधित आशिष दारूटे यांच्या मृतदेहाला पोलिस कर्मचारी तसेच नातेवाईकांनाच स्मशानभूमीत नेत अंत्यसंस्कार करावा लागला. या वेळी मृताचा भाऊ योगेश दारूटे, मयूर खैरनार, पोलिस कर्मचारी शशिकांत महाले, वसीम तडवी, कोरोना योगदान टीमचे सदस्य प्रदेश जैन, हर्षल बडगुजर ग्रामीण रुग्णालयातील हरीश पाटील, समीर शेख, रुग्णवाहिका चालक अविनाश भिसे आदींनी मृतदेह प्लास्टिकने पॅक करीत अंत्यस्कार केले. दरम्यान, मृत आशिष दारूटे हे सकाळी अकराला रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांचा साडेबाराला मृत्यू झाला. कर्मचारी व अधिकाऱ्याच्या वादामुळे सायंकाळी पाचला मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यानच्या वेळेत मृतदेहाची मात्र हेळसांड झाल्याचे दिसून आले.

संपादन- राजेश सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इलेक्टोरल बाँड्स खरेदीत दोन नंबरवर असणाऱ्या कंपनीला राज्यातील महत्वाची कंत्राटे

Latest Marathi News Update: उजनी धरणात पडलेल्या सर्व सहा जणांचे मृतदेह सापडले

HSC Result 2024 : भलामोठा डोंगर चढून केली पायपीट अन् लेकीसोबत मिळवलं बारावीच्या परीक्षेत यश

दोघांना शोधायला गेले अन् पाच जण बुडाले; प्रवरा नदीत नेमकं काय घडलं?

Yed Lagla Premach: अतिशा नाईक पुन्हा साकारणार खलनायिका; 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता

SCROLL FOR NEXT