robbery 
जळगाव

वीर जवानाच्या अंत्‍ययात्रेत खिसेकापूंनी केला हात साफ; ६७ हजाराचा ऐवज लंपास

दीपक कच्छवा

मेहुणबारे (जळगाव) : तांबोळे (ता. चाळीसगाव) येथे वीर जवानाला निरोप देण्यासाठी बाहेर गावाचे आलेल्या ग्रामस्थांचे खिसे कापण्याचा प्रकार घडला. यात काहींचे मोबाईलसह रोकड असा सुमारे 67 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

तांबोळे येथील जवान सागर धनगर यांच्यावर तांबोळे येथे अंत्यविधीच्या वेळी त्यांचे नातलग व गाव परीसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. यावेळी तळोंदे प्र.दे. येथील सुनील साबळे हे पती- पत्नी भाचे सागर यांच्या अंत्यसंस्कारासाठी तांबोळे येथे आले. सकाळी सव्‍वानऊच्या सुमारास वीर जवान सागर धनगर यांची अंत्ययात्रा घराकडून गावात जात होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. 

गर्दीत साधली संधी
लोक एकमेकांना धक्का देवून पुढे सरकत असतांना बसस्थानकावर उभे असलेले सुनील साबळे यांच्या खिशातील 18 हजार रूपयांची रोकड, 7 हजार रूपये किंमतीचा मोबाईल असा 25 हजार रूपयांचा ऐवज तसेच पाकिटात ठेवलेल्या वस्तु चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आले. ऐवढ्यावरच चोरटे थांबले नाही; तर अनेकांच्या खिशात हात टाकून त्‍यांनी रोकड लंपास केली. 

अशी गेली रक्‍कम चोरीला
चोरट्यांनी शाम जगताप (सोयगाव ता. मालेगाव) यांच्या खिशातील रोख 8 हजार रूपये, शरद लक्ष्मण जाधव (रा. तांबोळे) यांच्या खिशातून रोख अडीच हजार रूपये, शिवाजी जगन्नाथ साबळे (रा. दरेगाव) यांच्या खिशातून रोख 7 हजार रूपये, पांडुरंग भास्कर सपकाळे (रा. घोडेगाव) यांच्या खिशातून 5 हजार रूपये तर दीपक नारायण पाटील (रा. तांबोळे) यांच्या खिशातून 10 हजार रूपये मोबाईल, आदिनाथ बच्छे (रा. साईबाबा संस्थान शिर्डी) यांच्या खिशातून रोख 2 हजार रूपये, पॅनकार्ड, आधारकार्ड, एटीएमकार्ड, रामेश्वर धनगर (रा. दरेगाव) यांच्या खिशातून रोख साडेतीन हजार रूपये, रावसाहेब नारायण महाजन (रा. दरेगाव) यांच्या खिशातून रोख 1400 रूपये, किरण राजेंद्र साबळे (रा. दरेगाव) यांच्या खिशातून 2500 रूपये व मोबाईल, रविंद्र कुमावत (रा. तांबोळे) यांच्या खिशातून रोख 900 रूपये अशा सुमारे 11 जणांच्या खिशातून चोरट्यांनी रोख रकमेसह मोबाईल असा 67 हजार 800 रूपयांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार लक्षात येताच संबंधीतांनी येथे हजार असलेल्या चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती दिली. याप्रकरणी सुनील साबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT