child kidnaping case
child kidnaping case 
जळगाव

पत्‍नीला खूश करण्यासाठी त्‍याने केले होते असे कृत्‍य; पुन्हा चिमुकलीचे अपहरण

दीपक कच्छवा

मेहुणबारे (जळगाव) : न्हावे (ता. चाळीसगाव) गावातून दीड वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करणाऱ्याला चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास करुन अवघ्या बारा तासांत गजाआड केले. अपहरण करणारा संशयित पाटणादेवी येथील रहिवासी असून त्याच्यावर यापूर्वी देखील लहान बाळाचे अपहरण केल्याचा रेल्वे पोलीसात गुन्हा दाखल आहे. अपहरणकर्त्याच्या तावडीतून चिमुकलीची सुटका झाल्याने आईवडिलांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू तरळले. 
न्हावे (ता. चाळीसगाव) येथील भाईदास सोनवणे यांच्याकडे मंगळवारी (ता. २) सकाळी दहाच्या सुमारास एक तरुण आला. यावेळी सोनवणे यांची दीड वर्षाची मुलगी नेहा अंगणात खेळत होती. या अज्ञात तरुणाने नेहा हिला खाऊचे अमिष दाखवले व त्याच्या जवळच्या दुचाकीवर बसवून तिला पळवून नेले. चिमुरडी नेहाची आई दीपाली सोनवणे काही वेळाने घराच्या बाहेर आल्यानंतर मुलगी घरात नसल्याने त्यांनी तिचा शोध सुरु केला. मात्र, ती कुठेही मिळून आली नाही. दरम्यान, घरी दुचाकीवर आलेल्या तरुणाने आपल्या मुलीला नेल्याचे लक्षात आल्यानंतर दीपाली सोनवणे यांनी पतीसह चाळीसगाव ग्रामीण पोलीसात धाव घेतली. आपल्या मुलीबाबत घडलेला प्रकार पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना सांगितल्यानंतर पोलिसांनी चिमुकलीच्या अपहरणाप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. 

असा लावला तपास 
दीड वर्षाच्या बालीकेच्या अपहरणप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी लगेचच तपासाची चक्रे फिरवली. चिमुकलीच्या आईने ज्या एकावर संशय व्यक्त केला होता, पोलीसांनी संशयाचा हाच धागा पकडून तपास सुरु केला. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक संपत आहेर, हवालदार युवराज नाईक, नितीन आमोदकर, गोकूळ सोनवणे, दत्तात्रय महाजन, गोवर्धन बोरसे, जयंत सपकाळे, शांताराम पवार या सर्वांनीच जणू कंबर कसली. यातील हवालदार गोकूळ सोनवणे यांनी यापूर्वी अनेक गुन्ह्यांची यशस्वी उकल केली असल्याने त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या खबऱ्यांना अलर्ट केल्यानंतर काही वेळातच त्यांना अपहरण करणाऱ्या संशयिताची माहिती मिळाली. 

चिमुकलीला घेवून धुळ्यात पण..
संशयिताने चिमुकलीला आर्वी (धुळे) येथे नातलगाकडे नेल्याची माहिती मिळाली. मात्र, आर्वी येथील नातलगाला पोलिस शोध घेतल्याचे समजल्याने त्यांनी त्याला घरात घेतले नाही. त्यामुळे संशयित चिमुकलीला घेऊन रस्त्याने निघाला; मात्र दुचाकीतील पेट्रोल संपल्याने त्याने दुचाकी रस्त्यावर सोडून दिली व पायी चालू लागला. या दरम्यान, टिंगरी (ता. मालेगाव) येथील पोलीस पाटलाला या इसमाची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवल्यानंतर मध्यरात्री चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी चिमुरडीसह तिचे अपहरण करणाऱ्याला ताब्यात घेतले. 

संशयिताचा दुसरा गुन्हा 
कृष्णा रोहिदास सोनवणे (वय २८) असे अपहरण करणाऱ्याचे नाव असून त्याने यापूर्वी देखील लहान बाळाचे अपहरण केल्याचा गुन्हा रेल्वे पोलीसात दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्याच्या पहिल्या पत्नीला खूश करण्यासाठी त्याने २०१७ मध्ये चाळीसगाव रेल्वे स्थानकावरुन भिकारी महिलेच्या बाळाला चोरले होते. दरम्यान, न्हावे येथून चिमुकलीचे अपहरण करून संशयित कृष्णा ज्या दुचाकीने मालेगावकडे निघाला होता. ती दुचाकीही चोरीची असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, चिमुरडीचे त्याने अपहरण कशासाठी केले याची माहिती अद्यापपर्यंत मिळू शकली नाही. 
 
गावात आलेल्या एखाद्या अनोळखीच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्यास, तत्काळ गावातील पोलीस पाटील किंवा थेट आमच्याशी संपर्क साधावा. लहान मुलांना एकटे दुकटे बाहेर कुठेही सोडू नये. या घटनेत संशयित कृष्णा सोनवणेवर असाच गुन्हा दाखल असून त्याने बालिकेचे अपहरण कोणत्या उद्देशाने केले याचा तपास आम्ही करीत आहोत. 
- संजय ठेंगे, पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस ठाणे, चाळीसगाव 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT