suicide case suicide case
जळगाव

त्‍यांच्या इशाऱ्यांचा त्रास; तरूणीने उचलले टोकाचे पाऊल

घरातील तिचे एकटेपण साधत गावातील टारगट मुलांनी नाव घेण्यास सुरवात केली.

सकाळ डिजिटल टीम

चाळीसगाव (जळगाव) : तरूणी घरात रहायची. घरातील तिचे एकटेपण साधत गावातील टारगट मुलांनी नाव घेण्यास सुरवात केली. रोज तरूणीच्या घरासमोर येवून उभे रहायचे आणि इशारे करायचे. त्‍यांचा त्रास इतका वाढला की तरूणीने टोकाचे पाऊल उचलले.

मागील पंधरा दिवसांपासून घरासमोर येऊन इशारे करुन मानसिक त्रास देणाऱ्या तिघा तरुणांच्या जाचाला कंटाळून १६ वर्षीय तरुणीने विषारी द्रव्य सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना खेरडे तांडा (ता. चाळीसगाव) येथे घडली. या प्रकरणी गावातील तिघा संशयित तरुणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

घरासमोर येवून करायचे इशारे

खेरडे तांडा येथील १६ वर्षीय तरुणीला गावातील संशयित विशाल एकनाथ जाधव, विलास पुरनदास चव्हाण व पप्पू चरणदास चव्हाण हे तिघे गेल्या १५ दिवसांपासून त्रास देत होते. तिच्या घरासमोर जाऊन तिला इशारे करायचे. या प्रकारामुळे तरुणी व्यथित झाली होती. तिघा तरूणांकडून होणाऱ्या या जाचाला कंटाळून तरुणीने राहत्या घरी मोनोसील हे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

तिघांविरूद्ध गुन्हा

याप्रकरणी तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विशाल जाधव, विलास चव्हाण व पप्पू चव्हाण या तिघा संशयितांच्या विरोधात गोरख राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संपत आहेर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT