farmer 
जळगाव

चाळीसगाव तालुक्यात गहू, ज्वारीसह पिके आडवी 

सकाळवृत्तसेवा

मेहुणबारे (जळगाव) : चाळीसगाव तालुक्यात होत असलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या फळबागा व उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी (ता. २३) मेहुणबारे आणि बहाळ या दोन्ही मंडळांतच तब्बल एक हजार ८०० हेक्टरवर पिकांना वादळ आणि अवकाळी पावसाचा फटका बसला. या वादळात व पावसात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. 
तालुक्यात अनेक ठिकाणी शेतातील फळबाग व उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात प्रामुख्याने कांदा, गहू, ज्वारी, बाजरी, मका, आंबा व लिंबू फळबाग व इतर पिकांचा समावेश आहे. 

महसूल विभागाकडून पाहणी 
तहसीलदार अमोल मोरे व कृषी विभागाचे पथक बहाळ, टेकवाडे भागात पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करीत आहे. मेहुणबारे आणि बहाळ या दोन मंडळांतच मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने सुमारे एक हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान केले. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे कांदा, गहू, मका, आंबा, लिंबू, ज्वारी, बाजरी या पिकांचे काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. सुमारे अर्धा ते पाऊण तास पाऊस व वादळाने अक्षरश: धुमाकूळ घातला. बहाळ परिसर कैरीचे आगर मानले जाते. मात्र, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेवगा लिंबू, आंबा व अन्य फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. ज्वारी, बाजरी, मक्यालाही फटका बसला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVMवर भाजपच्या पर्यायावर टेप लावल्याची तक्रार; निवडणूक आयोग म्हणाले, खरं असेल तर पुन्हा मतदान घेऊ

Ambabai Temple Kolhapur : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात ओवरीतून उलगडला पुरातन ठेवा; महादेव पिंड, नंदीसह देव-देवतांच्या मूर्तींचे झाले दर्शन

Personal Loan vs Credit Card EMI: क्रेडिट कार्डचं बिल वाढलंय? EMI की पर्सनल लोन! कोणता पर्याय वाचवेल हजारो रुपये?

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये बॉम्ब सापडल्याने खळबळ; NIA कडे तपास

राज्यात हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना, ३०० कोटी वृष लागवड करणार; मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT