thief thief
जळगाव

पोलिसाचेच घर फोडले; सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास

पोलिसाचेच घर फोडले; सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास

राजेश सोनवणे

जळगाव : चाळीसगाव शहर पोलीस वाहतूक (Chalisgaon police) शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दिपक रावसाहेब जगताप यांच्या घरात चोरट्यांनी डल्‍ला मारला. साधारण २ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला आहे. (jalgaon-news-chalisgaon-police-house-thief-police-case)

पोलिस कॉन्स्‍टेबल दिपक जगताप हे धुळे येथे नातेवाईकांकडे लग्न कार्यक्रमानिमित्‍ताने गेले होते. घराला कुलूप लावून चावी घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरू प्रेमसिंग उर्फ बबलू राजपूत यांचेकडे दिली होती. २६ मेस रात्री घरी परत आल्यावर जगताप यांना घराचे (crime news) दार उघडे होते. कुलूप बाहेर भिंतीवर ठेवलेले होते. घरातील (Police constable house robbery) लाकडी कपाटाचे दरवाजेही उघडे होते.

सव्वादोन लाखाचा ऐवज लंपास

जगताप यांनी घरात जावून पाहिले असता कपाटातील एक लाख ६८ हजार रुपयांची रोकड, २० हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, १६ हजार रुपये किंमतीची चार ग्रॅम कानातील टॉप्स, २० हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची चेन असा एकूण २ लाख २४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी शहर पोलीसात दिपक जगताप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT