swimming death 
जळगाव

हृदयद्रावक..काका– पुतण्याला मृत्‍यूने गाठले; सकाळी तलावात पोहतांनाची घटना

हृदयद्रावक..काका– पुतण्याला मृत्‍यूने गाठले; सकाळी तलावात पोहतांनाची घटना

सकाळ डिजिटल टीम

चाळीसगाव (जळगाव) : तालुक्यातील वरखेडे लोंढे धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या काका– पुतण्याचा पोहतांना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (jalgaon-chalisgaon-warkhede-dam-uncle-and-boy-swimming-death)

चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे बुद्रुक येथील रहिवाशी हिरतसिंग जगतसिंग पवार व पुतण्या मृणाल इंद्रसिंग पवार हे काका– पुतणे आज सकाळी आठला वरखेडे लोंढे येथील धरणावर पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, पुतण्या मृणाल इंद्रसिंग पवार हा पाण्यात पोहत असतांना पाण्यातील जाळ्यात अडकला होता. पुतण्या पाण्यातून वर न आल्याचे पाहून काका हिरतसिंग पवार यांनी देखील पाण्यात उडी घेतली. यात दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

नागरीकांची पण मृतदेहच हाती

सदर घटना तलावाच्‍या आजूबाजूला असलेल्‍या नागरीकांच्या लक्षात आली. नागरीकांनी लागलीच धाव घेवून शोध घेतला परंतु त्‍यांना वाचवू शकले नाही. काही वेळानंतर दोघांचे मृतदेहच बाहेर काढण्यात आले. त्‍यांना चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे वरखेडे बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालिकेकडून ना भाडे, ना मोबदला… तरीही म्हाडाने भरला 26 लाखांचा मालमत्ता कर, नेमकं प्रकरण काय?

Chandoli Sanctuary Protest : जीव मुठीत घेऊन जगायचं कसं? सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गावांमध्ये बिबट्याची दहशत; शेतकऱ्यांचा वनविभागाला 21 दिवसांचा अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: संभाजीनगर नागपूर दृतगती महामार्गावर ट्रकला अपघात, चालक ठार

मुंबई इंडियन्ससाठी Vaibhav Sooryavanshi, तुमची साथ सोडू शकतो; राजस्थान रॉयल्स, 'पोस्टर बॉय'वर लक्ष ठेवा, ३० कोटी...

न्यायातील प्रतारणेबाबत कनिष्ठ न्यायालय बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT