chalisgaon lockdown chalisgaon lockdown
जळगाव

पोलिस बनून आला अन्‌ घातली हुज्‍जत; अखेर गुन्हा दाखल

पोलिस बनून आला अन्‌ घातली हुज्‍जत; अखेर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

चाळीसगाव (जळगाव) : येथील किराणा दुकानदारांशी हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ करणाऱ्या झीरो पोलिसाच्या विरोधात किराणा दुकानदारांच्या मागणीनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे किराणा असोसिएशनने पुकारलेला बेमुदत बंदचा निर्णय मागे घेतला असून, शुक्रवार (३० एप्रिल)पासून सकाळी सात ते अकरा या वेळेत नेहमीप्रमाणे किराणा दुकाने सुरू राहतील, असे संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र देशमुख यांनी सांगितले.

येथील पालिकेसह पोलिसांतर्फे सध्या लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे. कारवाई करताना पथकात सहभागी झालेल्या झीरो पोलिसांकडून एका दुकानदाराला शिवीगाळ केल्याचा प्रकार बुधवारी (ता. २८) घडला. त्यामुळे संतप्त झालेल्या किराणा व्यावसायिकांनी किराणा दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, गुरुवारी शहरातील सर्व किराणा व्यावसायिकांची दुकाने बंद होती. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील गुरुवारी सकाळी शहरात फिरून किराणा दुकानदारांना बंदचे आवाहन केले. त्याला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत किराणा दुकाने १०० टक्के बंद होती.

निवेदनाची दखल

प्रशासनाच्या नावाने खंडणी व बोगस पावत्या फाडणाऱ्या तोतया अमिनोद्दीन शेखवर उचित कारवाई करण्यासंदर्भात खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड आदींना निवेदन दिले. त्याची दखल घेत, गुरुवारी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र देशमुख, उपाध्यक्ष शांताराम नेरकर, सचिव श्यामकांत शिरुडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. पालिकेतर्फे दुकानदारांना देण्यात आलेल्या पावत्यांवर ‘त्या’ झीरो पोलिसाची स्वाक्षरी असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. जे दुकानदार नियमांचे पालन करतात, त्यांनाही विनाकारण त्रास दिला जात असल्याचे किराणा दुकानदारांनी सांगितले. घडलेल्या प्रकारातील सत्यता जाणून घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधित झीरो पोलिसावर गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिले.

अदखलपात्र गुन्हा दाखल

या प्रकरणी किराणा असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांत संशयित अमिनोद्दीन शेख मोयोद्दीन (रा. इस्लामपुरा, चाळीसगाव) याच्याविरोधात त्याचा काहीएक संबंध नसताना किराणा दुकानदारांशी अरेरावी करून दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे किराणा दुकानदारांमधून कौतुक होत आहे.

सर्व व्यापारी बांधवांनी बेमुदत दुकाने बंदचा जो निर्णय घेतला होता, तो प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मागे घेत आहोत. त्यामुळे उद्या (ता. ३०)पासून आपापली दुकाने सुरळीत सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू करावीत.

-जितेंद्र देशमुख, अध्यक्ष, किराणा भुसार व्यापारी असोसिएशन, चाळीसगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa ACB Raid Excise Checkposts : महाराष्ट्र-गोवा सीमा तपासणी नाक्यांवर एसीबीची धडक कारवाई; चेकपोस्टवर सापडली बेकायदा रोकड, 10 कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात

Microsoft Layoffs: अमेरिकेतील 'या' कंपनीने १०१ वर्षांत एकालाही नोकरीवरून काढले नाही! सीईओने काय दिले कारण?

Crime News: १५ वर्षांच्या शाळकरी मुलीची प्रसूती, लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षांच्या तरुणाने केले अत्याचार

Marathi News Live Updates : मुकेश अंबानी यांनी कुटुंबासह घेतले सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन, मंदिरात बाप्पाच्या चरणी लीन होत अर्पण केली प्रार्थना

Uttar Pradesh News: दिवाळीपूर्वी योगी सरकारकडून किमान वेतनाचे नवे दर जाहीर; १ ऑक्टोबरपासून सुधारित वेतन लागू

SCROLL FOR NEXT