jalgaon news civil hospital 
जळगाव

शासकीय रुग्णालयात बेशिस्त वाहनांवर पोलिसांचा ‘वॉच’ 

देवीदास वाणी

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वाहन पार्किंगला शिस्त लागावी म्हणून रुग्णालयाच्या प्रांगणात उभ्या केलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या हवा सोडण्याचा प्रयोग आज वाहतूक शाखेच्या मदतीने करण्यात आला. यामुळे रुग्णालयात बेशिस्पतपणे वाहन लावणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे. अनेक वेळा सांगूनही वाहनधारक बेशिस्त पार्कीग करीत होते. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध आजारांवर उपचार करण्यासाठी जिल्हाभरातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक येतात. सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत ओपीडीची वेळ असते. दिवसभरात आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी देखील रुग्णांची ये-जा सुरू असते. त्याचबरोबर रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहिका तसेच रुग्ण घेऊन येणारी वाहने यासह संशयित आरोपी घेऊन येणाऱ्या पोलिसांच्या वाहनांना मुख्य गेट क्रमांक १ मधून प्रवेश दिला जात आहे. असे असताना देखील काही वाहनधारक हे रुग्णालयाच्या आवारामध्ये सुरक्षारक्षकांना न जुमानता वाहने लावीत आहेत, असे निदर्शनास आले आहे. 

हवा सोडली
महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाहेरील बाजूस महापालिकेने भुयारी गटारीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे गेट नंबर २ हे महापालिकेच्या कामामुळे तात्पुरते बंद आहे. त्यासाठी वाहनांना ये-जा करण्यासाठी मुख्य गेट क्रमांक १ मधून तात्पुरता प्रवेश दिला जात आहे. तेथून वाहन थेट पार्किंगच्या दिशेने नेऊन वाहन तळाला पार्किंग करणे अपेक्षित आहे. मात्र अनेक वाहनधारक हे त्यांचे वाहन रुग्णालयाच्या आवारामध्येच पार्किंग करीत आहेत. सुरक्षारक्षकांनी सूचना केल्यावर देखील वाहन चालक उर्मटपणे वागत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव बेशिस्त वाहनधारकांच्या वाहनांची हवा सोडावी लागत आहे. यात दिवसभरात ४५ वाहनांची हवा सोडण्यात आली. यापुढे पोलिस दलाच्या वाहतूक शाखेची मदत घेऊन वाहनधारकांना शिस्त शिकविण्यात येणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिडकोच्या २६ हजार घरांवरील संभ्रम अखेर दूर! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; LIG लाभार्थ्यांमध्ये मात्र अनिश्चितता कायम

Crime News: महिलेला क्रूरपणे संपवले; शीर कापले अन् घेऊन गेले, धक्कादायक घटनेनं खळबळ

मिडल ईस्टच्या युद्धाचा मिडल क्लास लोकांना फायदा; 90 हजारपर्यंत करू शकता बचत, पेट्रोल-डिझेलच टेन्शन संपणार

Numerology : कुटुंबासाठी काहीही करू शकतात 'या' 4 मुलांकाचे लोक, कुणी अपमान केल्यास बदला घेण्यासाठी करतात हद्द पार

IPL 2026: 'मी जेव्हा CSK साठी खेळायचे, तेव्हा...' शिवम दुबेविरुद्ध आक्रमक सेलिब्रेशनवर जडेजाने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT