night curfew 
जळगाव

जळगावात यंदाची थर्टी फर्स्‍ट होणार अशी; नवे नियम लागू

देवीदास वाणी

जळगाव :: जळगाव शहर महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंतची संचारबंदी आजपासून लागू करण्यात आली आहे. संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ५ नियम मोडणाऱ्यांना दंड व शिक्षा दोन्ही करण्यात येतील, ही संचारबंदी ५ जानेवारीपर्यंत सुरू राहील.अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ३१ डिसेंबरला मात्र रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत जळगाव महापालिका क्षेत्रासह सर्व जिल्ह्यात (नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामीण) संचारबंदी लागू असेल. 

महापालिकेचे आयुक्त सतीष कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यावेळी उपस्थित होते. ब्रिटनमध्ये नवीन कोरोना विषाणू आढळला असून त्याची दक्षता म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी जाहीर केली. विमानतळावरून येणाऱ्यांना १४ विलगीकरणात ठेवण्याचे सक्त आदेश आहे.जिल्ह्यात नवीन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ही दक्षता घेतली जात आहे. 

रस्‍ते राहणार निर्मनुष्‍य
महापालिका क्षेत्रात सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीची अंमलबजावणी कडक होईल. पेालिस फ्लांईग स्क्वाट रात्रभर फिरत असतील. अत्यावश्‍यक सेवा वगळून इतरांना अटकाव केला जाईल. ठिकठिक़ाणी पोलिसांची डयूटी लावली जाईल. संचारबंदी कोणालाच फिरता येणार नाही. 
 
कामगारांची वेळ बदला 
एमआयडीसी किंवा इतर ठिकाणी रात्रपाळी करणाऱ्या कामगारांना एकतर रात्री अकरा्च्या अगोदर कामावर बोलवा, त्यांना अकराच्या अगोदर घरी जावू द्या. अशा सूचना सर्व एमआयडीसीतील उद्योजकांना देण्यात आल्या आहेत; जेणे करून त्यांना रात्री अकरानंतर घरी जाताना किंवा परत येताना अडचणी येणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 
१४ हजार बेडची सज्जता 
कोरोनाची दुसरी लाट आली तरी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. १४ हजार ५०० बेड कोरोना बाधीतांसाठी तयार आहेत. त्यांच्यावर तातडीचे उपचार केले जातील. कोरोनाची लस जानेवारी २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यास प्राप्त होणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Dispute : 'तृणमूल'च्या नाव-चिन्हाचा वाद; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, निवडणूक आयोगाला ४ महिन्यांची मुदत

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर विधानसभेत राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव बहुमताने मंजूर; भाजपचा सभात्याग

School Safety: सीसीटीव्हीविना विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर; हिंगोली जिल्ह्यातील अनेक सरकारी, खासगी शाळा सुरक्षेच्या ‘नजरे’बाहेर, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT