crime 
जळगाव

पीडितेकडून अत्‍याचाराची तक्रार; कुटुंबीयांवर पुन्हा हल्ला, पिडीताही असुरक्षीत

रईस शेख

जळगाव : शहरातील चौगुले प्लाट भागात सतरा वर्षीय पिडीतेच्या तक्रारीवरुन शनिपेठेत दाखल गुन्ह्यात दोन संशयीत अटकेत आहे. दाखल गुन्ह्याची तक्रार मागे घ्यावी यासाठी पिडीतेवर सारखा दबाव आणला जात असुन तक्रार मागे घेत नाही म्हणुन काही दिवसांपुर्वी घरात शिरुन मारहाण झाली. त्याची तक्रार झाल्याने पुन्हा पिडीतेच्या कुटूंबाशी भांडण उकरुन काढल्याने तुंबळ हाणामारी होवुन परस्पर विरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पिडीतेने दिलेल्या तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे १२ ऑगस्ट २०२० रोजी तेजस दिलीप सोनवणे व चेतन पितांबर सोनार यांच्या विरुद्ध पिडीतेने अत्याचाराची तक्रार दिल्यावरुन पोक्सो अंतर्गत गुन्हादाखल होवुन दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेसाठी २५ फेब्रुवारीला संशयीत तेजस सोनवणे याचे वडील दिलीप विश्वनाथ सोनवणे, चेतन सोनार याचा भाऊ खुशाल सेनार, पुनम सपकाळे अशांनी शनिपेठ पेलिस ठाण्यात दाखल गुन्हा मागे घ्यावा यासाठी मारहाण केल्या प्रकरणी २६ फेब्रुवारी रेजी संबधीतांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. दाखल गुन्ह्याबाबत वृत्तपत्रातुन बातमी आल्यानंतर रविवार (ता.२८) रोजी दुगाबाई पितांबर सोनार यांनी तू माझ्या मुलावर केलेली केस मागे घेत नाही असे म्हणत केस ओढत खाली पाडले. तसेच कुटूंबीयांना मारहाण केल्या प्रकरणी दुर्गाबाई, खुशाल, पितांबर सेनार, भागवत सोनार अशांच्या विरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

दुसऱ्या तक्रारीत 
दुर्गा पितांबर सेनार यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, रविवार (ता.२८) रोजी घरात एकत्रीत चर्चा करत असतांना दिपक शिवनारायण पाटिल, धनंजय पाटिल, वासुदेव पाटिल, यांनी हातात लाठ्या काठ्यात घेत घरात शिरले व माधुरी व तीच्या सोबत एक अशांनी हातात विटा घेत आमच्यावर हल्ला चढवत मारहाण केली. यात पितांबर सोनार व भागवत सोनार असे दोघे भाऊ जखमी झाले असून भांडण सोडवतांना दुर्गा सोनार यांनाही माराण करुन प्रताडीत करण्यात आल्याचे तक्रारीत नमुद असुन परस्पर विरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT