Nana patole 
जळगाव

नाना पटोलेंच्या उपस्थितीत उद्या फैजपूर येथे मेळावा

नाना पटोलेंच्या उपस्थितीत उद्या फैजपूर येथे मेळावा

सकाळ डिजिटल टीम

फैजपूर (जळगाव) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बुधवारी (ता. २३) शहरात येत आहे. त्या संदर्भात रावेर- यावल तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नियोजन बैठक फैजपूर येथे आमदार तथा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात झाली. (jalgaon-news-congress-meet-faizpur-nana-patole)

आमदार शिरीष चौधरी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले, की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले हे बुधवारी (ता.२३) सकाळी नऊला शहरात धनाजी नाना महाविद्यालय परिसरात मेळावा घेणार आहेत. यात प्रामुख्याने केंद्र सरकारने केलेल्या शेतकरीविरोधी काळे कायदे यांचा निषेध करणार आहे. बैठकीत रावेर, यावल तालुक्यातील कार्यकर्त्यांवर कार्यक्रमाची जबाबदारी निश्चित करण्यात आली.

आदिवासी, शेतकरींची वेशभुषा सादरीकरण

स्वागतासाठी होर्डिंग, बॅनरसह रावेर- यावल तालुक्यातील शेतकरीबांधव, पारंपरिक वेशभूषा आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषा यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच कोविड नियम पाळून शिस्तबद्ध कार्यक्रम करण्याचे आवाहन केले. बैठकीस यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, रावेर तालुका काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, गटनेते कलिम मन्यार, नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, चंद्रशेखर चौधरी, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, डॉ. सुरेश पाटील, विनायक महाजन, महेश राणे, गुणवंत सातव, भगतसिंग पाटील, अमोल भिरुड, संदीप सोनवणे, नगरसेवक योगेश गजरे, डॉ. राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष शेख रियाज, वसीम जनाब, यावल शहराध्यक्ष कदिर खान, जावेद जनाब, अमोल भिरुड, अनिल जंजाळे आदी उपस्थित होते. गणेश गुरव यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT