coronavirus coronavirus
जळगाव

कायदा फक्त सामान्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी नाही..!

कायदा फक्त सामान्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी नाही..!

सकाळ डिजिटल टीम

चोपडा (जळगाव) : गेल्या दोन दिवसांत शहरात चोपडा नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दरोडेखोरप्रमाणे दादागिरी चालू आहे. त्याला महाराष्ट्रात तोड नाही. सामान्य लोकांना त्रास देणे आणि कोणत्याही दुकानावर जाऊन पोलिस व नगरपालिकेचा कर्मचाऱ्यांचा ५० ते ६० लोकांचा ताफा सोशल डिस्टन्सचा वापर न करता गुंडगिरीप्रमाणे दुकानदारांना फक्त त्रास देणे, हाच एकमेव उद्देश ठेवून त्यांना आर्थिक व मानसिक त्रास देणे हा प्रकार सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे, हे जेवढे ही कर्मचारी आहेत, त्या सर्वांचा पगार सुरू आहे. फक्त व्यापारी वर्गचा वर्षभरापासून पगार बंद आहे. इकडे कोणाचेही लक्ष नाही. कायदा फक्त सामान्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी नाही, असा आरोप चोपडा व्यापारी महामंडळाने केला आहे.

बंद असलेले दुकानाचे कुलूप उघडायला लावून व झुंडशाहीने दबाव टाकून जबरीने पाच ते दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा प्रकार सुरू आहे. गरीब बिचाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास देण्यापेक्षा अधिकाऱ्यांची जे हप्ते वसुली व टक्केवारी सुरू आहे, याच्यावर नियंत्रण कोण ठेवणार, असा सवाल महामंडळाने केलेला आहे. हा सर्व प्रकार सामान्य माणसाकडून मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असताना पोलिसांकडून त्यालाही मारहाण करण्यात आली.

व्‍यापारी महामंडळाची तक्रार

छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वसामान्य माणसांकडून पोलिसांची दादागिरीने वसुली सुरू आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे सोशल मीडियाद्वारे व्यापारी महामंडळाने तक्रार केली आहे. हा प्रकार बंद करावा, अशी मागणी व्यापारी महामंडळ अध्यक्ष अमृतराज सचदेव, अनिल वानखेडे, भवरलाल जैन, श्याम परदेशी, संजय कानडे, सुनील बरडिया, संजय श्रावगी, श्याम सोनार, राजेंद्र जैन, प्रवीन जैन, संजय जैन यासह शेकडो व्यापाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : 'कॅप्टन' खरातचे सिन्नरमध्ये मालमत्तांचे जाळे; पत्नीच्या नावावर कोट्यवधींचे भूखंड, तपासात नवी माहिती समोर

"दागिन्यांच्या जाहिरातीत माझ्यासारख्या मुलीला.." प्रियदर्शिनीच्या बहिणीची रवी जाधव यांच्यासाठी भावूक पोस्ट

Raj Thackeray: संतांची भूमी आणि भोंदूंचा उच्छाद; अशोक खरातसारख्या नीचला राजकीय आश्रय? पोस्टमधून राज ठाकरेंचा संताप, काय म्हणाले?

अल्पवयीन मुलींना गर्भपातास परवानगी, पण बाळाला जन्म दिल्यास काय होणार? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Why Acidity Suddenly Increases : उन्हाने पोट दुखतं, पित्ताशयात खडे तर नाहीत ना? ॲसिडिटीचाही होतोय त्रास? कडक उन्हाळ्यात अनेकांना आरोग्याच्या समस्या

SCROLL FOR NEXT