collector abhijit raut 
जळगाव

अन्‌ कलेक्‍टर, एसपी रस्‍त्‍यावर उतरतात तेव्हा.. विना मास्‍क, गर्दी करणाऱ्यांवर केली कारवाई

देवीदास वाणी

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. यामुळे विना मास्क फिरणारे, गर्दी करणाऱ्यांवर कारवाईसाठी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे चक्क रस्त्यावर उतरले. सकाळी दहा ते बारा दरम्यान शहरातील सर्व व्यापारी संकूलात फिरून त्यांनी नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला. तर पन्नास जणांवर विना मास्क फिरणे व सामाजीक अंतर न पाळणे याप्रकरणी जागेवरच दंडही केला आहे. 

कोरोना बाधीतांची संख्या जळगाव शहरात सर्वाधिक आहे. नागरिक विना मास्क फिरताहेत, गर्दी करताताहेत, सामाजीक अंतर पाळत नाही यामुळे कोरोना संसर्ग जलद गतीने वाढतोय. आज सकाळी दहाच्या सुमारास जिल्हाधिकारी राऊत, पोलिस अधिक्षक डॉ. मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त वाहुळे, शहर वाहतूक पोलिस निरीक्षक देविदास कुनगर, तहसिलदार नामदेव पाटील, मंडळाधिकारी योगेश नन्नवरे, तलाठी व पोलिस कर्मचारी उपस्‍थित होते.

मार्केट अन्‌ रस्‍त्‍यावर नुसती धावपळ
जिल्‍हाधिकारी राऊत हे स्‍वतः रस्‍त्‍यावरव उतरल्‍याने धावपळ सुरू झाली होती. फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट, चित्रा टॉकीज परिसर, नवीपेठ, गोलाणी मार्केट परिसरात फिरून विना मास्क फिरणारे, गर्दी करणाऱ्यांवर जागेवरच कारवाई केली. श्री.राउत, डॉ.मुंडे यांनी व्यापाऱ्यांना विना मास्क येणाऱ्यांना माल देवू नका अशी सूचना केली. यामुळे एकच धावपळ सुरू झाली होती.

पोलिसांना पाहून काढत होते पळ 
विना मास्क फिरणाऱ्यांना पकडून जागेवरच पाचशे रूपयांचा दंड करण्यात येत होतो. यामुळे विना मास्क फिरणारे पोलिसांना पाहून पळ काढत होते. त्यांना पकडून दंड करण्यासाठी त्यांच्या मागे पोलिस पळतानाचे चित्र गोलाणी मार्केट परिसरात दिसून आले. दूपारी बारापर्यंत एकूण पन्नास जणांवर कारवाई करण्यात आली होती. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT