marriage corona 
जळगाव

लग्‍न मंडपात पोहचले पोलिस, साऱ्यांची तारांबळ; विवाहसोहळ्यावर कारवाई पाच गुन्हे दाखल

संजय पाटील

पारोळा (जळगाव) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईचे सत्र सुरु झाले आहे. लग्‍न सोहळ्याला उपस्‍थितीतचे निर्बंग लावण्यात आले असताना देखील गर्दी होत आहे. अशात आज (ता.21) मोठी लग्‍नतिथ असताना मंडपात गर्दीत मावत नव्हती. यामुळे  विवाह सोहळ्यात 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळुन आल्याने पोलिस प्रशासनाकडुन पाच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले; तर तब्बल 44 हजाराचा दंड वसुल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होवु नये; यासाठी शासनाकडुन अलर्ट जारी करण्यात आला आहे. लग्नसराईत गर्दी वाढु नये, यासाठी पालिका व पोलिस प्रशासन यांची करडीनजर असुन विवाह सोहळ्यात नियमांचे पालन, सामाजिक अंतर किंवा मास न लावलेली व्यक्ती आढळल्यास कारवाई केली जात आहे.

लग्‍न सोहळ्यात पोहचले पोलिस
रविवारी (ता.21) लग्नसराईची मोठी तिथी होती. त्या अनुषंगाने पालिका व पोलिस यांनी कारवाईची मोहीम राबवित शहरातील बालाजी पार्क जवळील पेंढारपुरा, आझाद चौक व बालाजी शाळेमागे, मिस्कीनबा दर्ग्याजवळ अशा परिसरात थेट जावुन कारवाई केली. यावेळी पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे, सपोनि निलेश गायकवाड, करनिरीक्षक संदीप साळुंखे, पालिका कर्मचारी एच. एम. पाटील आदी पालिका कर्मचारी उपस्थित होते.

नववधु-वर यांचे नातेवाईकांना धास्ती 
मागील वर्षी कोरोनामुळे विवाह सोहळ्यांना ब्रेक लागला होता. यंदा समाधानकारक परिस्थिती राहील असे वाटत असतांना फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची वाढती संख्या पाहता प्रशासनाकडुन 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास कारवाईचे संकेत मिळत असल्याने नववधु- वर पित्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. अगोदरच लग्न सोहळ्यात जेवणावळी व बँन्ड व इतर खर्चाचे अँडव्हान्स बेणे दिले गेले असतांना कारवाई होत असल्याने नातेवाईकात संभ्रम निर्माण होत असुन कार्यक्रम असणाऱ्या व्यक्तींपुढे मोठे संकट निर्माण झाल्याचे चित्र दिलुन येत आहे.
 
संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्यास उशीर? कर्मचाऱ्यांना 3 लाखांचं नुकसान; काय आहे गणित?

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT