covaxin 
जळगाव

जळगाव जिल्ह्याला १९ हजार नवीन लसी उपलब्ध; आजपासून १३ केंद्रांवर लसीकरण 

देवीदास वाणी

जळगाव : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनावर प्रतिबंधक लसीकरण भारतात सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातही गेल्या शनिवार (ता. १६)पासून कोरोना लसीकरण सात केंद्रांवर सुरू आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी १९ हजार नवीन लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे सोमवार (ता. २५)पासून लसीकरण सहा नवीन केंद्र होणार आहे. आता एकूण १३ केंद्रांवर लसीकरण होणार आहे. 
जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी २४ हजार ३२० लसी अगोदरच उपलब्ध आहेत. शनिवार (ता. १६पासून कोरोना लसीकरण सुरू आहे. त्यात आणखी १९ हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे सहा लसीकरण केंद्रेही सोमवारपासून वाढविण्यात आली आहेत. यात रावेर, पाचोरा, यावल, मुक्ताईनगर, अमळनेर व जळगाव शहरातील एका नानीबाई रुग्णालयाचा समावेश आहे. या नवीन केंद्रांवरील आरेाग्य कर्मचाऱ्यांना शनिवारी (ता. २३) प्रशिक्षण देण्यात आले. रविवारी (ता. २५) ड्राय रनही झाला. 

आता आठवड्यातील पाच दिवस लस
जिल्ह्यात एकाचवेळी १३ केंद्रांवर पाच दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. मंगळवार व रविवार वगळता सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवारी असे पाच दिवस लसीकरण होईल. 

जिल्ह्यात १९ हजार नवीन कोरोना लसी उपलब्ध झाल्या आहेत. सोमवारपासून सहा नवीन लसीकरण केंद्रे सुरू होतील. १६ फेब्रुवारीपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होईल. यात ज्यांनी महिनाभरापूर्वी लस घेतली आहे त्यांनाच दुसरा डोस दिला जाईल. 
-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT