corona corona
जळगाव

तू मारल्यासारखं कर.. मी रडल्यासारखं करेल..!

गंभीरच नव्हे तर रुग्णांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या त्रुटी समोर येऊ लागल्यांय..

सचिन जोशी

जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खासगी हॉस्पिटलने मांडलेला ‘बाजार’ गेल्या काही दिवसांपासून विविध स्वरुपात समोर येतोय. काही तक्रारींच्या पार्श्वभूमीवर या बाजारांची तपासणीही सुरु झालीय. गंभीरच नव्हे तर रुग्णांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या त्रुटी समोर येऊ लागल्यांय.. पण, या हॉस्पिटलला नोटीस बजावून खुलासा मागविण्यापलीकडे प्रशासन पुढे सरकत नाहीये.. ‘तू मारल्यासारखं कर.. मी रडल्यासारखं करेल..’ असा हा कार्यक्रम दिसतोय..

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट संसर्गाच्या दृष्टीने अधिक तीव्र आहे. या लाटेचे गंभीर परिणामही समोर येत आहेत. तरुणांसह अ्ल्पवयीन बालक आणि अगदी नवजात शिशूही कोरोनाच्या विळख्यात बळी पडतांय.. वाढत्या रुग्णांना बेड, ऑक्सिजन, रेमडेसीव्हिर इंजेक्शन पुरविणे जिकरीचे होत असताना शासकीय यंत्रणा हतबल आणि खासगी आरोग्य व्यवस्था ‘धंदेवाईक’ झाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळतेय.

वाढत्या रुग्णसंख्येचा अंदाज घेत प्रशासनाने जिल्हाभरात ४० पेक्षा अधिक खासगी हॉस्पिटलला कोविड उपचारांसाठी मान्यता दिली आहे. ही मान्यता देताना नेमके कोणते निकष या हॉस्पिटल्सनी पूर्ण केले आणि पूर्ण केले नसतील तर प्रशासनाने नेमके काय तपासले? हा प्रश्‍नच आहे. कारण, यातील काही हॉस्पिटल्सची तपासणी केली असता, किंवा त्यासंबंधी येणाऱ्या तक्रारींचे स्वरुप पाहता अनेक गंभीर बाबी उघड झाल्याचे आता सर्वश्रुत झालेय.

तज्‍ज्ञांचा अभाव

डिग्री नसलेले डॉक्टर, सुविधा नसलेली व्यवस्था, तज्ज्ञांचा अभाव असलेली यंत्रणा हे चित्र कमी- अधिक प्रमाणात मान्यताप्राप्त कोविड हॉस्पिटलमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या तपासणीत तर यापेक्षाही अधिक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. त्यावर यातील काही हॉस्पिटलला नोटीसा बजावून त्यांच्याकडून खुलासे मागविण्यात आले आहेत. या चार- पाच हॉस्पिटलपैकी एकाने तर परवाना निलंबित असताना कोविड रुग्णांवर उपचार केले, तर दुसऱ्याच दिवशी आणखी एका हॉस्पिटलचा परवाना निलंबित करण्यात आला.

केवळ हॉस्पिटलचा परवाना निलंबित करुन काय होणार? आणि आजवर त्यांनी केलेल्या गंभीर त्रुटी, नव्हे तर गुन्ह्यांचा हिशोब कोण मागणार? पुरेशा सुविधा नसताना त्यापोटी लाखोंचे बिल लाटणारे आणि त्यासाठी रुग्णांसह त्यांच्या नातगलांना वेठीस धरणाऱ्या अशा संवेदनाशून्य डॉक्टरांची खरेतर प्रॅक्टिसह बंद केली पाहिजे. परंतु, आपले प्रशासन एवढे कार्यक्षम आणि कर्तव्यकठोर होईल त्या सुदिनाची अद्याप प्रतीक्षा आहे.

खासगी प्रॅक्‍टिस ‘कु’प्रसिद्ध

काही सन्माननीय अपवाद वगळता जळगावातील वैद्यकीय व्यवस्थेत खासगी यंत्रणेची प्रॅक्टिस देशभरात ‘कु’प्रसिद्ध आहे. मग, या वैश्‍विक महामारीकडे धंद्याची संधी म्हणून ही यंत्रणा पाहत असेल तर ते माणुसकीशून्य असंवदनशील कृतीचे बीभत्स दर्शन म्हणावे लागेल. महामारी असो की सामान्य स्थिती, अशा प्रवृत्तींवर प्रशासन आणि समाजाचा कायमस्वरुपी वचक हवाच. अन्यथा, या हॉस्पिटल्सला नोटीस, त्यांचे खुलासे आणि पुढे सर्व काही आलबेल.. ही केवळ औपचारिकता राहील..

संपादन- राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: डोंबिवलीत काँग्रेसला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंकडून नाराजी उघड

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT