corona death corona death
जळगाव

उपचारासाठी प्रयत्‍न पण आई- वडील गमावले; पतीला बेड न मिळाल्याने पत्नीला हृदयविकाराचा झटका

पतीला बेड न मिळाल्याने पत्नीला हृदयविकाराचा झटका

डि. एस. पाटील

धरणगाव (जळगाव) : पतीला कोरोनाची लागण.. उपचारासाठी अमळनेर, जळगाव येथे प्रयत्न करूनही बेड न मिळाल्याने शेवटी मुलाने पुण्याला कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, इकडे उपचाराच्या चिंतेने पत्नीला हृदयविकाराच्या झटका आला, त्‍यात त्यांचा मृत्यू झाला. तर पत्नीचा मृत्यू झाल्याचे दुःख अनावर झाल्याने तिकडे पतीनेही प्राणत्याग केला. उपचारासाठी धावपळ करीत असताना दोन दिवसांत पती- पत्नीचा मृत्यू झाल्याने धरणगावातील रामकृषणनगर परिसर हादरला आहे.

धरणगाव येथील रामकृष्णनगरमधील रहिवासी तथा कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडे यांचे वडील भीमराव तोडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी संजय तोडे यांनी अमळनेर, जळगावला प्रयत्न केले. मात्र, कुठेही बेड मिळेना, शेवटी तोडे यांचा लहान भाऊ सैन्यदलात असल्याने पुणे येथे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

अवघ्‍या दोन दिवसात साथ सोडली

पतीच्या उपचारासाठी मुलाची होणारी धावपळ आणि कोरोनाचा धसका संजू तोडे यांच्या वृद्ध आई वत्सलाबाई तोडे यांनी घेतला आणि पती, पुत्र पुण्याला असतानाच त्यांना घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. वत्सलाबाई यांचा लहान मुलगा, तोडे यांचे लहान भाचे-भाची आणि मुले शिवाय समरसता मंचाच्या कार्यकर्त्यांनी वत्सला यांच्यावर अंतिम संस्कार केले. तिकडे पत्नी गेल्याचे कळल्याने पती भीमराव तोडे यांनीही प्राणत्याग केला. अवघ्या दोन दिवसांत पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन- राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT