jalgaon collector jalgaon collector
जळगाव

जिल्ह्यात उद्यापासून दुकाने सुरू; वेळेचे बंधन कायम

शहरासह जिल्ह्यात उद्यापासून दुकाने सुरू; वेळेचे बंधन कायम

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : कोरोना महामारीच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी शासनाने लावलेलया कडक निर्बंधामुळे गेल्या अडीच महिन्यापासून अत्यावश्‍यक दूकाने बंद होती. आता मात्र कोरोना बाधीतांची संख्या अतिशय कमी झाली आहे. सोबतच जिल्हयाचा (Jalgaon coronavirus) पॉझीटीव्हीचा रेट दोन टक्क्यांपर्यंत आला आहे. यामुळे शासनाच्या सूचनेनूसार निर्बंध कायम आहे. त्यालाच अनूसरून जिल्ह्यातील सर्व दुकाने (मॉल वगळता) उद्यापासून सूरू राहतील. अत्यावश्‍यक सेवेतील दूकाने 9 ते २, अनावश्‍यक दूकानांची वेळ ९ ते २ अशी असेल अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी आज दिली. (coronavirus-lockdown-new-rules-order-jalgaon-collector-raut)

शनिवार, रविवार दोन्ही दिवस अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहणार आहेत. आज दूपारी साडेचारला सेंट्रल फुले मार्केट असोसिएशन, कॅट असोसिएशन (अखिल भारतीय ट्रेडस असोसिएशन), व्यापारी महामंडळासह इतर व्यापाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी राउत यांनी बैठक घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांनी घेतली भेट

जिल्हयाचा पॉझीटीव्हीटी रेट दोन टक्कयांपर्यंत आला आहे. कोरोना बाधीतांची संख्याही घटली आहे. खासगी रुग्णालयातील व शासकीय रुग्णालयातील कोरोना रूग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. गेल्या अडीच महिन्यापासून सर्वच व्यापारी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. व्यापार नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वाटल्यास वेळेचे बंधन टाका, आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळू मात्र दुकाने सुरू करावीत अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

दुपारी दोननंतर निर्बंध कायम

जिल्हाधिकारी राऊत यांनी वेळेच निर्बंध घातले, कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले. अत्‍यावश्‍यक सेवेतील दूकाने ९ ते २ तर इतर दूकानांची वेळ ९ ते २ अशी करण्यात आली. नंतर मात्र निर्बंध कायम राहतील. फक्त मेडीकल, दवाखाने सुरू राहतील.

नियम पाळा, व्यापार करा

जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची बाजू ऐकून सर्वच दूकाने सुरू करण्यास वेळेच्या निर्बंधासह परवानगी दिली आहे. व्यापाऱ्यांनी कोरोनोच सर्व नियम पाळून व्यापार करावा. गर्दी होवून कोरेानाचा उद्रेक होणार नाही याकडे लक्ष दयावे. मास्क शिवाय माल देवू नये, असे आवाहन कॅट असोसिशनचे उपाध्यक्ष दिलीप गांधी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT