corona lockdown corona lockdown
जळगाव

साहेब, गाडी फिरली तरच चूल पेटते!

साहेब, गाडी फिरली तरच चूल पेटते!

संजय पाटील

पारोळा (जळगाव) : राज्य शासनाने संचारबंदी लागू आहे, तसेच वाढत्या कोरोनाच्या संक्रमणामुळे अनेक जण काम असताना देखील घराबाहेर पडत नसल्याने खासगी टॅक्सी, रिक्षाचालकांना दिवसभर बसून प्रवाशांची वाट पाहावी लागत आहे. ‘साहेब, गाडी फिरली तरच घरात चूल पेटते’, अशी व्यथा टॅक्सीचालक व मालक यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली. शासनाने याबाबत दखल घेऊन आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा देखील टॅक्सी चालक व मालक संघटनेने व्यक्त केली आहे.

संचारबंदी काळात शासनाने बस व खासगी वाहतुकीला परवानगी दिली आहे. मात्र, टॅक्सीत प्रवासीच बसत नसल्याने दिवसभर प्रतीक्षा करीत चालक व मालकांना बसून राहावे लागत आहे. याबाबत टॅक्सी रिक्षाचालक व मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर कासार यांनी ‘सकाळ’कडे व्यथा मांडताना सांगितले, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उद्योग व व्यवसाय बंद आहेत. मार्च ते मे हे लग्नसराईचे दिवस असतात. मात्र, याच महिन्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने बरेच गरजू प्रवासी दुचाकी किंवा स्वत: च्या वाहनाने प्रवास करीत असतात. तर कोरोनाच्या भीतीने अनेक जण प्रवास करणे टाळत आहेत. त्यामुळे दिवसभरातून एखादी फेरी होते तर होत नाही.

नागरीकांचे हित पण हातावर पोट असणाऱ्यांचे काय?

गाडीत डिझेल टाकावे की, पोटाची खळगी भरावी. गाडी फिरली तर चूल पेटेल, अशी परिस्थिती चालक व मालक यांची झाली आहे. यासाठी शासनाने दखल घेऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. नागरिकांच्या हितासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, हातावर पोट असणाऱ्या चालक व मालक यांची गाडीच फिरली नाही तर पोट कसे भरावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने गरजूंसाठी व हातावर पोट असणाऱ्या नागरिकांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. यात टॅक्सी रिक्षाचालक, मालक यांचा समावेश करावा, अशी मागणी देखील टॅक्सी - रिक्षाचालक यांनी केली आहे.

बसला चाळीस; टॅक्सीला पाच सीटची परवानगी

शासनाने वाहतुकीला हिरवा कंदील दिला असला तरी टॅक्सीला पाच प्रवाशांची परवानगी दिली आहे. त्यामुळे डिझेलचे पैसे देखील एका फेरीत पूर्ण होत नसल्याची खंत चालकांनी व्यक्त केली तर बसला ४० जणांची परवानगी दिली असल्याचे समजते. तालुक्यात पारोळा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, चाळीसगाव, कासोदा असे तब्बल ५० ते ६० चालक व मालक टॅक्सी, रिक्षा चालवित असतात. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या वेळी आर्थिक मदतीची मागणी मधुकर कासार, रमेश पाटील, हेमकांत क्षत्रिय, प्रवीण क्षत्रिय, अण्णा पाटील, वाल्मिक पाटील, रामकृष्ण पाटील यांनी केली आहे.

संपादन- राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict Pune: ''आता फासावर चढा.. वय नव्हे, क्रूरता महत्त्वाची'' निकालपत्र वाचून दाखवताना कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Venezuela Earthquake: नेमारची फुटबॉल मैदानापलीकडची माणुसकी! भूकंपाच्या धक्क्यातून सावरणाऱ्या देशाला मदतीचा हात; किती दिली देणगी?

नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टाचा मोठा निर्णय; ६० दिवसात निकाल अन् सुनावणी

Latest Marathi News Live Update : जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे... कुडाळमध्ये 17 वर्षांपासून पुरुषांकडून अनोखी वटपौर्णिमा

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! 2 प्रसिद्ध अभिनेत्रीचाही सहभाग; गिरगावमध्ये पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT