shirish choudhary shirish choudhary
जळगाव

तक्रार करण्याऐवजी आमदारांनी खांद्याला खांदा लाऊन काम करावे : शिरीष चौधरी

तक्रार करण्याऐवजी आमदारांनी खांद्याला खांदा लाऊन काम करावे : शिरीष चौधरी

योगेश महाजन

अमळनेर (जळगाव) ः कोरोना महामारीत खानदेशात मृत्यदर वाढला आहे. एकीकडे लोकांचे प्राण वाचवणे महत्वाचे आहे. मात्र, आमदार अनिल पाटील गलिच्छ राजकारण करत आहेत. त्यांनी तक्रार करण्याऐवजी माझ्या खांद्याला खांदा लाऊन काम करावे. त्यांनी केलेल्या तक्रारीचा निषेध करत असल्‍याची टीका माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

माजी आमदार चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की लोकांचे प्राण वाचावेत म्हणून आपण गरजू रुग्णांना 'ना नफा ना तोटा' या तत्वावर रेमडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना भेटून काही कंपनीकडे उपलब्ध असलेला साठा एक्स्पोर्ट करून जनतेला उपलब्ध करून घ्यावा; अशीही मागणी आपण केली आहे. मात्र, यात महाविकास आघाडी राजकारण करीत आहे. आमच्याकडे रेमडिसिव्हीरबाबतचे सर्व परवानेही आहेत. आजही शासनाने परवानगी दिल्यास आपण दहा लाख इंजेक्शन उपलब्ध करून जनतेचे प्राण वाचवू शकतो.

तर आमदार कोरोना पॉझिटीव्‍ह होतात

विद्यमान आमदार लोकांचे काम आले की एकदा नव्हे दोनदा कोरोना पॉझिटीव्ह होतात. दुसरीकडे त्यांचा दोनच दिवसात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत फोटो झळकतो. ही जनतेच्या डोळ्यात धूळफेक असून त्यांना लोकांच्या जीवाची काहीही पडलेली नाही. कमिशनमध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे. त्यांनी हे राजकारण थांबवून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करावी. त्यांनी तक्रार करण्याऐवजी अमळनेरकारांना इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत. आम्ही जनतेच्या सेवेसाठी बांधील असून, कुणाचे प्राण वाचत असतील तर त्यांनी शंभर गुन्हे दाखल केले तरी आम्ही जनतेची सेवा अविरत सुरू ठेवू, असेही त्यांनी शेवटी पत्रकार परिषदेत सांगितले.

निधीत भ्रष्‍ट्राचार

आमदार चौधरी यांनी यावेळी सर्व परवानगीचे कागदपत्रे आतापर्यंत केलेल्या पुरवठ्याची कागदपत्रे पत्रकारांना दाखवली. आमदार पाटील यांनी कोरोना काळात मिळालेल्या निधीत भ्रष्टचार करून साहित्यही उपलब्ध नसल्याचा आरोप करून आपल्याकडे पुरावे असल्याचे सांगितले.

संपादन- राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT