sero survey 
जळगाव

जिल्ह्यात ‘सिरो’चा तिसरा सर्व्हे; ५११ जणांचे घेतले नमूने

देवीदास वाणी

जळगाव : पुणे येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ( l.C.M.R.) पथकाने पुन्हा चार महिन्यानंतर सिरो सर्वेक्षण-३ केले आहे. यात तब्बल ५११ जणांच्या रक्ताचे नमुने घेवून सर्वेक्षण पथक पुणे येथे रवाना झाले आहे. आगामी एक ते दीड महिन्यात तिसऱ्या सर्व्हेक्षणाचा अहवाल येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन. सी. चव्हाण यांनी दिली. 

कोरोना १९ ची लागण झाल्यानंतरचा हा तिसरा सर्व्हे होता. भारतामध्ये लोकसंख्येच्या आधारित सार्स करोना २ ( SARS-Cov-२) या विषाणू संक्रमण प्रसाराचे स्वरूप (प्रसाराची व्याप्ती) समजण्यासाठी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील नऊ गावांची व जळगाव शहरातील महापालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक ५७ या भागाची निवड करण्यात आली होती. यावल तालुक्यातून मोहराळे या गावाची निवड करण्यात आली होती. पूर्वीच्या सर्वेमध्ये ४०० लोकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यात ६० टक्के लोकांना कोरोनाची लागण होवून गेल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. किंवा त्यांची रोगप्रतिकार शक्ती (इम्यूनिटी पॉवर)चांगली असल्याने त्यांनी कोरोनाला परतावून लावले असा निकष काढण्यात आला होता. आता परत तिसरा सर्वे करण्यात आला. त्यात ज्यांचे अगोदर नमुने घेतले होते. त्यांच्यासह चोपडा गावातील इतर १११ जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. 

चार दिशातील घरांची निवड
प्रत्येक गावातील सर्वेक्षणासाठी चार दिशातील घरांची निवड करण्यात आली होती. त्यांचे सर्वेक्षण करून निवड झालेल्या घराची व घरातील १० वर्षावरील निवड झालेल्या व्यक्तींचे रक्ताचे ४१ नमुने घेण्यात आले. या सर्वेक्षणातून आपल्याला लोकसंख्येच्या वेगवेगळ्या गटामध्ये तसेच पुरुष-स्त्री ह्या दोन लिंगामध्ये किती प्रसार झाला आहे, ज्या दराने काळानुसार नवीन संक्रमण (केसेस) होत आहे हे समजून घेण्यास मदत होणार आहे. यामधून उपलब्ध होणारे ज्ञान कार्यक्रम व्यवस्थापन यांना संसर्गाचा प्रसार रोखण्यास आणि नियंत्रण ठेवण्यासाठी, मार्गदर्शक तत्त्वे बनवण्यासाठी मदत होणार आहे. ‘आयसीएमआर’च्या दहा टीम जळगावला आल्या. त्यांच्यासोबत जिल्हा ग्रामीण रुग्णालयाची टीम देण्यात आली होती. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Zika Virus: पुण्याला ‘झिका’चा धोका कायम! विषाणूच्या जनुकीय संरचनेतही आढळले बदल; ‘एनआयव्‍ही’च्‍या शास्‍त्रज्ञांचा शोध

Sunetra Pawar: दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून धीर; पाणी, चारा, शिक्षणासाठीही मदत

IND vs WI 1st ODI Live: रोहित शर्मा बाद झाला, विराट कोहली मैदानावर आला... येताच २८ वर्षांपूर्वीचा मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला...

४ वर्षात १११ खासदार-आमदारांचे पक्षांतर, सर्वाधिक इनकमिंग झालेला पक्ष भाजप नव्हे, भाजपात २९ जणांचा प्रवेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT