coronavirus testing 
जळगाव

दिलासा..यु.के.तून आलेल्यांची कोरोना टेस्ट ‘निगेटीव्ह’

देवीदास वाणी

जळगाव : ब्रिटनमध्ये नवीन कोरोना विषाणू आढळल्याने देशासह राज्यात, जळगाव जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश दिले आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांना मुंबई, पुणे विमानतळावरच क्वारंटाइन केले जात आहे. गेल्या २०- २२ दिवसांपूर्वी यू.के.मधून सात नागरिक जळगाव जिल्ह्यात आले आहेत. त्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्या नागरिकांची कोरोना चाचणी ‘निगेटीव्ह’ आली आहे. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. सी. चव्हाण यांनी सांगितले, की जळगाव जिल्ह्यात २०-२२ दिवसांपूर्वी यूकेतून सात जण आले होते. त्यांची कोरेाना चाचणी करण्याबाबत आदेश आले होते. आरोग्य यंत्रणेने संबंधितांची त्यांची घरी जावून कोरोना चाचणी घेतली. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यांना आठ दिवस घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यु.के.मधून भुसावळमधील चार, चाळीसगावमधील दोन, जळगावमधील एक नागरिक आले होते. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT