coronavirus coronavirus
जळगाव

ऑगस्‍टमध्‍ये तिसरी लाट येण्याची शक्‍यता; दुसरी लाट ओसरण्यास दहा दिवसांचा अवधी

ऑगस्‍टमध्‍ये तिसरी लाट येण्याची शक्‍यता; दुसरी लाट ओसरण्यास दहा दिवसांचा अवधी

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus second wave) संपण्यासाठी अजून किमान दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागू शकतो. पहिली लाट संपुष्ठात आली, तेव्हा रोज सापडणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची (Jalgoan coronavirus) संख्या सर्वांत कमी म्हणजे ११ (२६ जानेवारी) होती. सर्वांत कमी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३०४ होती. सध्याचा नवीन पॉझिटिव्ह रुग्ण व ॲक्टिव्ह रुग्णांची (Jalgoan corona positive patient ratio) संख्या पाहता आठपट अधिक असल्याचा दावा आरोग्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे. (jalgaon-news-coronavirus-third-wave-come-to-august-month)

सध्या जळगावची नवीन बाधित रुग्णांची संख्या ८० आहे. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजार १२५ आहे. पहिली लाट दिवाळीपूर्वी संपुष्टात आली होती. दिवाळीनंतर दुसरी लाट येणार, अशी शक्यता वर्तविली जात होती. कारण नागरिक दिवाळीत एकमेकांच्या घरी ये-जा करतील. त्यातून कोरोनाचा प्रसार होईल, अशी भीती होती. मात्र, दिवाळीनंतरही लाट आली नाही. मात्र ती फेब्रुवारीत उच्चांकावर पोचली. पहिल्या लाटेत ॲक्टिव्ह रुग्णसंख्या तीनच्या आत होती. यामुळे सर्व तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर, खासगी कोविड सेंटर, डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटलमधील कोविड रुग्णालय बंद करण्यात आले होते. सोबतच डॉ. पाटील रुग्णालयातील स्थलांतर केलेले जिल्हा रुग्णालयही पूर्ववत जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. सर्व जण, यंत्रणा कोरोनाची पहिली लाट संपली, असे मानून पूर्वीप्रमाणे व्यवहार करू लागले होते.

दुसऱ्या लाटेत ऑक्‍सीजनचे महत्‍त्‍व

पहिल्या लाटेत सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे झाले. विशेषतः ज्यांना अगोदरच रक्तदाब, मधुमेह अशी व्याधी होत्या आणि त्यांना उशिराने रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचाच मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले होते. फेब्रुवारीत कोरोनोने पुन्हा डोके वर काढत बारा हजारांवर रुग्णसंख्या गेली. या लाटेत तरुणांसह कोणालाही कोरोना होत होता. विशेषतः धाप लागून जीव घाबरून श्‍वास घेण्यास त्रास होणाऱ्यांची संख्या अधिक होती. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शनची अधिक गरज भासली. तेव्हा सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व कळाले.

तर त्‍यांनाच कोविड सेंटरची मान्‍यता

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची सर्वाधिक गरज रुग्णांना भासल्याने ज्या खासगी रुग्णालयात ऑक्सिजनची सोय आहे, त्यांनाच खासगी कोविड सेंटर यापुढे देण्याचा निर्णय झाला आहे. अडीच ते तीन महिन्यांच्या निर्बंधानंतर आता कोठे जिल्ह्याची कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या आटोक्यात येत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास असलेली संख्याही काही दिवसांत कमी होण्यास मदत होईल.

जिल्ह्यात तिसऱ्या लाटेसाठी सहा ऑक्सिजन प्लांट, पुरेसे बेड, ९०० खाटांच्या अत्याधुनिक मोहाडी रुग्णालयाची उभारणी सुरू आहे. बालके अधिक बाधित होतील, अशी शक्यता आहे. यामुळे जिल्हा कोविड रुग्णालयात, मोहाडी रुग्णालयात बालकांसाठी वेगळे कक्ष तयार करण्यात येत आहेत.

– डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT