jalgaon lockdown 
जळगाव

तीन दिवसांचा लॉकडाउन, मात्र नागरिक रस्त्यावरच 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात रविवार (ता. २८)पासून तीन दिवसांचा लॉकडाउन सुरू झाला आहे. असे असले तरी नागरिक काहीनकाही कामांनिमित्त रस्त्यावर दिसत होती. पोलिस वर्दळीच्या चौकात गस्तीवर होते. पोलिसांनी रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्याला थांबवून विचारपूस केली. योग्य कारण असेल तरच जावू दिले अन्यथा फटके दिले. 
चालू महिन्यात ११ (रात्री ८) ते १५ मार्च (सकाळी आठपर्यंत) दरम्यान तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावला होता. मात्र रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी त्यात वाढच झाली. यावरून नागरिक एकमेकांच्या संपर्कात आले. होळी व धूलिवंदन हे उत्सव लक्षात घेता संपर्कातून अधिक प्रसार वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून पुन्हा रविवारपासून तीन दिवसांचा लॉकडाउन लावण्यात आला आहे. 

बिनधास्‍त फिरणे तेही विना मास्‍क
लॉकडाउनच्या पहिल्या दिवशीही शहरात नागरिक पायी व वाहने घेऊन फिरताना आढळून आले. कोणाच्या तोंडाला मास्क नव्हते, तर कोणाकडे आपण कोठले कर्मचारी आहोत याचे ओळखपत्रही नव्हते. पायी चालणारेही बिनधास्त फिरताना दिसून आले. दुपारी अकरानंतर आकाशवाणी चौकात पोलिस दिसून आले. त्यांनी काही वाहने अडवीत चौकशी केली. चित्रा टॉकीज चौक, राजकमल चौक, नेरी नाका, कालिंकामाता चौक, अजिंठा चौफुली, पांडे चौक, इच्छादेवी चौफुली, गणेश कॉलनी, शिवकॉलनी आदी परिसरात पोलिसच नसल्याने नागरिक बिनधास्त फिरताना आढळून आले. 
 
व्यापारी संकुलात शुकशुकाट 
एरवी गर्दीने फुलत असलेली सर्व व्यापारी संकुलात रविवारी शुकशुकाट दिसून आला. सेंट्रल फुले मार्केट, गांधी मार्केट, दाणा बाजार, चित्रा चौक परिसरातील दुकाने, गोलाणी मार्केट, भास्कर मार्केट, आंबडेकर मार्केट, रेल्वेस्थानकाकडील मार्केट आदी व्यापारी संकुलांत शुकशुकाट होता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT