jalgaon corona free sakal
जळगाव

हॉटस्पॉट ठरलेले जळगाव कोरोनामुक्तीकडे; दिवसभरात एकमेव रुग्ण

हॉटस्पॉट ठरलेले जळगाव कोरोनामुक्तीकडे; दिवसभरात एकमेव रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : मार्च, एप्रिलमध्ये रोज तीनशेवर रुग्ण आढळत असल्याने हॉटस्पॉट (Corona Hotspot) ठरलेल्या जळगाव शहरात बुधवारी (ता. १६) अवघ्या एका रुग्णाची नोंद झाली. त्यामुळे शहराची वाटचाल कोरोनामुक्तीच्या (Jalgaon corona update) दिशेने सुरू आहे. जिल्ह्यातही नवे ६३ बाधित आढळून आले. (coronavirus-update-hotspot-jalgaon-city-corona-free)

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत आहे. लॉकडाउनचे सकारात्मक परिणाम अनलॉकनंतरही दिसून येत आहेत. बुधवारी प्राप्त साडेचार हजार चाचण्यांच्या अहवालापैकी ६३ नवीन बाधित आढळून आले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४१ हजार ७२१ झाली. दिवसभरात १४४ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांची संख्या एक लाख ३७ हजार ५०५ वर पोचली आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७.०३ टक्के झाला आहे. २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बळींची संख्या आता दोन हजार ५६५ झाली आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर- एक, जळगाव ग्रामीण- तीन, भुसावळ- तीन, अमळनेर- चार, चोपडा- तीन, पाचोरा- सहा, धरणगाव- दहा, यावल- तीन, एरंडोल- चार, जामनेर- तीन, रावेर- पाच, पारोळा- चार, चाळीसगाव- आठ, मुक्ताईनगर- दोन, बोदवड- तीन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT