coronavirus update 
जळगाव

सावधानतेचा इशारा; जळगावातील कोरोनाचे पहा अपडेट

सचिन जोशी

जळगाव : तीन महिन्यांपासून काही प्रमाणात नियंत्रणात असलेला कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून पन्नाशीच्या आत रुग्णसंख्या राहत असताना गुरुवारी दिवसभरात तब्बल ७१ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्या तुलनेत अगदी निम्मेच म्हणजे ३७ रुग्ण बरे झाले. 
जळगाव जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून रुग्णसंख्या सातत्याने घटत आहे. या तीन महिन्यांत काही दिवसांचे अपवाद वगळता दररोज नव्या बाधितांची संख्या बरे होणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कमी नोंदली जात होती. शिवाय, अनेक दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या पन्नाशीच्या आत राहत होती. गुरुवारी प्राप्त अहवालांमध्ये मात्र जिल्ह्यात तब्बल ७१ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५५ हजार ५६२ झाली आहे. तर ३७ रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा ५३ हजार ८२४ वर पोचला आहे. 

ॲक्टिवर रुग्ण चारशेवर 
गेल्या काही दिवसांपासून घटत असलेल्या रुग्णसंख्येमुळे ॲक्टिव रुग्णसंख्या कालपर्यंत साडेतीनशेच्या टप्प्यात होती. आज ती पुन्हा चारशेचा टप्पा पार करुन ४१९वर पोचली. दुसरीकडे चाचण्या वाढल्यानेही रुग्णसंख्या जास्त दिसत आहे. गुरुवारी आरटीपीसीआर चाचणीचे १६२७ तर ॲन्टीजेन चाचण्यांचे १०७६ असे एकूण २८०० अहवाल प्राप्त झाले. त्यातून ७१ रुग्ण सापडले आहेत. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर २३, जळगाव ग्रामीण, जामनेर, पारोळा तालुक्यात प्रत्येकी २, भुसावळ ११, अमळनेर ६, चोपडा ४, यावल ५, रावेर ५, चाळीसगाव ७, धरणगाव, एरंडोल तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT