corona 
जळगाव

व्हायरस पसरतोय..बोदवड, पाचोऱ्यातही कोरोनाचा विस्‍फोट‍

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा संसर्ग कायम वाढता आहे. मागील चोवीस तासात जिल्‍ह्‍यात १ हजार १४१ नवीन बाधित आढळून आले. विशेष म्‍हणजे चोपडा तालुक्‍यातील होणारा विस्‍फोट आज कमी झाला; मात्र बोदवड आणि पाचोरा तालुक्‍यात विस्‍फोट झालेला दिसून आला.
जिल्‍ह्‍यात मागील चोवीस तासात आढळून आलेल्‍या बाधितांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला. त्‍यानुसार जिल्ह्यात आढळून आलेल्या रूग्णांपेक्षा बरे होणारे रूग्ण जास्त असले तरी दिवसभरात जिल्ह्यात आज १ हजार १४१ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार १७१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. 

पुन्हा चौदा जणांचा बळी
जिल्‍ह्‍यातील मृत्‍यूचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही. मागील आठवडाभरापासून जिल्‍ह्‍यात मृत्‍यूचा आकडा तेरा ते पंधराच्या दरम्‍यान आहे. कोरोना अहवालानुसार आज दिवसभरात पुन्हा १४ रूग्‍णांचा कोरोनाने मृत्‍यू झाला आहे. यामुळे जिल्‍ह्‍यातील एकूण मृतांचा आकडा सतराशेच्यावर पोहचला आहे. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत ९७ हजार ९९ बाधित रूग्ण आढळून आले असून, त्यापैकी ८३ हजार ६७१ रूग्ण बरे होवून घरी पतरले आहे. तर ११ हजार ७०२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. 

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर १६८, जळगाव ग्रामीण २७, भुसावळ १०२, अमळनेर ५३, चोपडा ७९, पाचोरा १२१, भडगाव ३२, धरणगाव ५५, यावल ६२, एरंडोल ४१, जामनेर ४४, रावेर ८८, पारोळा ३७, चाळीसगाव ३२, मुक्ताईनगर ९२, बोदवड १०३ आणि इतर जिल्ह्यातील ५ असे एकुण १ हजार १४१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT