corona update 
जळगाव

दुसऱ्या दिवशीही ३७ नवे बाधित; दोघांचा मृत्‍यू

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोना संसर्गाचा फैलाव कमी झाला आहे. तरी देखील आज देखील बुधवारइतकेच ३७ नवीन बाधित आढळून आले आहेत. तर ४७ रूग्‍ण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग अजूनही पुर्णपणे नष्‍ट झालेला नाही. प्रमाण कमी असले तरी चिंता आहेत. बाजारात अगदी मोकळेपणाने फिरणाऱ्यांनी याचा विचार करून मास्‍क वापरणे बंधनकारक आहे. परंतु असे होताना दिसत नसल्‍याने कोरोनाची लागण अजून देखील होत आहे. आज आलेल्या कोरोना अहवालाप्रमाणे जिल्ह्यात एकुण ५६ हजार ७६५ बाधित रूग्ण आढळून आलेत. त्यापैकी ४७६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर ५४ हजार ९३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. 

जळगावात दोघांचा मृत्‍यू
जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या अहवालानुसार आज जिल्ह्यातून ३७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ४७ रूग्ण बरे होवून घरी परतले. आज देखील सात तालुके निरंक राहिले. मात्र मृत्‍यूचा आकडा अजून देखील थांबलेला नसून जळगाव शहरातील दोन रूग्णांचा मृत्यू झाल्‍याचे जिल्हा कोवीड रूग्णालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर १६, भुसावळ ४, चोपडा २, भडगाव १, यावल २, एरंडोल १, जामनेर २, रावेर ४, चाळीसगाव ५ असे एकुण ३७ बाधित रूग्ण आढळले आहे. तर जळगाव ग्रामीण, अमळनेर, पाचोरा, धरणगाव, पारोळा, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्‍यांमध्ये एक देखील रूग्‍ण आढळून आला नाही.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

Police Officer Death: अचानक प्रकृती बिघडली अन् रक्ताची उलटी झाली; २५ वर्षीय महिला पोलिसाची मृत्यूशी झुंज अपयशी

SCROLL FOR NEXT