jalgaon market crowd sakal
जळगाव

जळगाव जिल्ह्यात शनिवार, रविवार दुकाने राहणार बंद

जळगाव जिल्ह्यात शनिवार, रविवार दुकाने राहणार बंद

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : काही कोरोना निर्बंध (Coronavirus lockdown) शिथील केल्याने जिल्ह्यात सर्वच दुकाने सकाळी ७ ते दूपारी २ दरम्यान सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र शनिवार व रविवार दोन दिवस (Jalgaon weekend lockdown) इतर दुकाने बंद राहतील, या दोन दिवशी फक्त अत्यावश्‍यक सेवेतील दूकाने सुरू राहणार आहेत. तसे आदेश काढण्यात आले आहे. दुकाने बंदच्या पार्श्वभूमीवर आज सेंट्रल फुले मार्केट, फुले मार्केट सह सर्वच (Jalgaon market crowd) व्यापारी संकूलात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. (jalgaon-coronavirus-weekend-lockdown-saturday-and-sunday)

गेल्या मंगळवारपासून (१ जून) शासनाच्या निर्देशानूसार ज्या जिल्‍ह्‍यात कोरोना (Jalgaon corona update) रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट दहा टक्क्यांच्या आत आहे; तेथे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यात जळगावचाही सामावेश होता. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी निर्बंध शिथील करीत सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सलून, ब्यूटीपार्लर, स्पा वगळता इतर सव दुकाने सकाळी ९ ते दूपारी २ दरम्यान सुरू आहेत. शनिवार व रविवारी मात्र इतर सर्व दुकाने बंदचे आदेश आहेत. यामुळे आज बाजारपेठेत इतर दुकानात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

पाय ठेवणेही कठीण

शहरातील फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केटमध्ये आज बंदच्या पार्श्वभूमीवर महिलांची खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. हॉकर्सनी रस्त्यावरच दुकाने थाटली होती, त्यातच वाहनधारकांनी वाहनेही रस्त्या लावल्याने महिलांना रस्त्यावर चालताही येत नव्हते. मात्र खरेदी तर गरजेची होती. यामुळे महिला मिळेल त्या ठिकाणावरून हव्या असलेल्या वस्तू खरेदी करीत होत्या. बाजारात होणारी गर्दी पाहता कोरोनाला कसे नियंत्रणा ठेवणार असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT