robbery matter
robbery matter 
जळगाव

आडदांड चोरट्याला साठवर्षीय वृद्धाची 'धोबीपछाड'; देान लाखांची बॅग लांबतांनाचा थरार

रईस शेख

जळगाव : पोलिस अधीक्षकांचे निवास्थान 'अभय' बंगल्या समोरच एचडीएफसी बँकेतून दोन लाख रुपये घेवून जाणाऱ्या वृध्दाच्या हातून बॅग हिकावुन चोरटा पळत सुटला. शरीरयष्टीने धष्टपुष्ठ आडदांड या भामट्यांची 'बैल' ताकद साठ वर्षीय चिवट वृद्धासमोर मात्र कमीच पडली. बॅगसोबत स्वतः फरफटत जावून चोर..चोर आरेाळ्या ऐकताच अनेक जण धावुन आले..दुचाकीसह चोर खाली पडला अन्‌ त्याच्यावर पब्लीक संताप कोसळला. यथेच्छ धुलाई नंतर त्याला पेलिसांना सोपवण्यात आले. राहुल उत्तम चौधरी (वय-२६ रा.मांडगी ता.भडगाव) असे चोरट्याचे नाव आहे. 

शनिपेठेतील धनराज प्रेमराज पुरोहित (वय -६०) यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. नेहमी प्रमाणे त्यांनी काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेतून दोन लाख रुपये काढले व बॅग घेवून बँकेतून बाहेर पडले, पायी मोपेड पर्यंत चालत असतांनाच मागून दुचाकीवर आलेल्या भामट्याने त्यांच्या हातातील पिशवी हिसकावुन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, साठ वर्षातही काटक शरीर असलेल्या पुरोहितांनी बॅग सोडलीच नाही. उलट त्यासोबतच फरफटत असतांना आराडाओरड केली. भांबाऊन गेलेला चोरटा दुचाकीसह खाली कोसळला. तो, पर्यंत ये-जा करणारे आणि प्रत्यदर्शींनी त्याला गाठत यथेच्छ धुलाई केली. घटनेची माहिती रामानंदनगर पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस पोहचत नाही तोवर पाच-पन्नास लोकांनी राहुल चौधरी नामक या तरुणाला आडवा, उभा करुन सोलून काढले त्यात तो, बेशुद्ध पडल्याने सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी तत्काळ जिल्‍हा रुग्णालयात रवाना केले. दोन-तीन तासांच्या उपचारानंतर तो, शुद्धीत आल्यावर त्याला अटक करण्यात आली. पुरोहीत यांच्या तक्रारीवरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

गुन्हेगार ओळखपरेड अन्‌ धावपळ 
सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा शहरातील इतर गुन्हेगारांची ओळख परेड घेत असतांनाच, बॅगलिफ्टींगचा फोन आल्याने सहाय्यक निरिक्षक दिपक बिरारी, संदीप परदेशी, रविंद्र पाटील, रविंद्र चौधरी, हरिष डोईफोडे अशांनी धाव घेतली. जमावाच्या तावडीतून सोडवल्याने चोराचा जीव वाचला. अन्यथा चोरट्याला जमावाने मारुनच टाकल्याची परिस्थीती निर्माण झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले. 

चोरीसाठी दुचाकी..संशयीत 
राहूल उत्तम चौधरी (रा. मांडगी ता. भडगाव) असे चोराचे नाव निष्पन्न झाले. त्याच्या दुचाकीची नंबरप्लेट उलटी करुन लावली असून. (एम.एच. १९. सी.क्यू ५००७)असा क्रमांक आहे. ही, दुचाकी शिवाजी नगरातील अब्दुल खाटीक याच्या नावावर रजिष्टर असल्याचे तपासात निष्पन्न झाले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT