जळगाव : पिंप्राळा हुडको येथील ७० वर्षीय वयोवृध्द आजीबाईच्या घरात सावत्र मुलगी आणि त्याच्या नवऱ्याने डाका टाकल्याची घटना घडली. पाच हजारांची रेाकड दागिने आणि देव असा ऐवज लांबवल्या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात देाघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा हुडको ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस कस्तुराबाई दशरथ ब्राम्हणे (वय-७०) मिळेल ते काम करुन, काम नसलेच तर.. भिक मागून आपला उदरनिर्वाह करतात. कोणीही नसल्याने त्या एकट्याच वास्तव्यास आहेत. बुधवार (ता. ३) रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कस्तुराबाई यांना सावत्र मुलगी ठगुबाई, जावाई नवल बागुल भेटण्याच्या बाहाण्याने घरात आले. प्रकृतीची विचारणा करत..गोड-गोड बोलून कस्तूराबाई यांना बोलण्यात गुंतवुन एकामागून एक दोघांनी घरझडती घेत चक्क चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
भिकेचा पैसाही..चोरला
कस्तुराबाई यांनी मिळेल ते, कामकरत वेळप्रसंगी भिक्षामागून गोळा केलेले ५ हजार रुपये रोख २०० ग्रॅम चांदीची लक्ष्मीची मुर्ती, ९ हजारांचे ४ सोन्याचे टॉप्स असा ऐवज घरात एका लोखंडी पेटीत कुलूपबंद करुन ठेवलेला होता. देाघांनी बोलाण्यात गुंतवत चावी काढून पेटीतील हे साहित्य अलगत लंपास करुन पेटीला कुलूप लावले.
ठगुबाईवर आजीला शंका
इतके वर्षे आपण भिक मागतोय आजवर सावत्र मुलगी ठगुबाईने ढूंकून बघीतले नाही. उपाशी- तापाशी आजारपण अंगावर काढत असतांना कोणी बघायला देखील आले नाही आणि अचानक आज जावायासह का..आली, घरात येवून काय केले; यांची शंका कस्तुरबाबाई यांना आली..पेटी उघडून बघातच त्यांचा संशय खरा ठरला. चोरी झाल्याचे कळताच त्यांनी आज सकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
संपादन ः राजेश सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.