crime news crime news
जळगाव

सासरी येवून जावयाचे कृत्‍य; सासू- सासऱ्याला मारहाण

सासरी येवून जावयाचे कृत्‍य; सासू- सासऱ्याला मारहाण

राजेश सोनवणे

पाचोरा (जळगाव) : लोहारा (ता. पाचोरा) येथील कापड दुकानदार (Merchant) असलेल्या सासऱ्यास येवला येथील जावई आणि त्यांच्या वडील व भावाने घरात घुसून मारहाण (Crime news) केली. याप्रकरणी अज्ञातांसह नऊ जणांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा (Police case) दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news crime news mother-in-law beaten heating)

लोहारा येथील दिव्यांग असलेले कापड दुकानदार प्रफुल्ल राका यांनी याबाबत तक्रार दिली आहे. लोहारा येथे कापड दुकान चालवत असून दुकानामागेच घर आहे. मोठ्या मुलीचा विवाह येवला येथील हितेश श्रीश्रीमाळ यांच्याशी झाला. परंतु तिचा छळ होत असल्याने ती माहेरी येवून राहते. सध्या तिला कोरोनाची बाधा झाली असून ती उपचार घेत आहे.

प्रथम आल्‍या दोन महिला

गुरुवारी (ता.१३) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन महिला दुकानात आल्या व त्यांनी साड्यांची मागणी केली. लॉकडाऊनमुळे दुकान बंद असल्याने त्यांना नकार दिला असता त्यांनी दमदाटी करत भ्रमणध्वनीवरून बोलणे केल्यानंतर जावई हितेश श्रीश्रीमाळ, त्यांचे वडील विजय श्रीश्रीमाळ व भाऊ सुयोग श्रीश्रीमाळ यांचेसह चार अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून घरात शिरले. त्यांनी प्रफुल्‍ल राका यांच्यासह पत्नीस व नातवंडांना मारहाण केली.

कपाटातून दागिने व रक्‍कम नेण्याचा प्रयत्‍न

घरातील कपाटातून पाच तोळ्याचा सोन्याचा चपलाहार व वीस हजार रुपये रोख काढून वाद घालण्याचा प्रयत्न केला. परंतु शेजारी जमा होत असल्याचे पाहून हे सर्व जण पळून गेले. या तक्रारीनुसार पोलिसांनी हितेश श्रीश्रीमाळ, विजय श्रीश्रीमाळ, सुयोग श्रीश्रीमाळ यांच्यासह चार अज्ञात पुरुष व दोन महिला अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. घरात घुसून मारहाणीच्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमधून संतप्त भावना व्यक्त झाल्या. पुढील तपास उपनिरीक्षक दिगंबर थोरात करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: विश्वविक्रमासह भारतीय संघ फायनलमध्ये! अफगाणिस्तानला नमवले, आता जेतेपदासाठी इंग्लंडशी भिडणार

Dombivli News : डोंबिवलीत मराठी तरुणी एकता सावंतच्या शोर्मा गाडीचे उद्घाटन, मराठी मुलगी व्यवसाय करणारच; मनसे तिच्या पाठीशी खंबीर

Mumbai Local: मुंबईतील प्रवाशांना दिलासा! गर्दीच्या वेळी एक्सप्रेस गाड्या थांबणार; लोकल वेळेवर धावण्यासाठी रेल्वेचा कठोर निर्णय

Pune Dive Ghat Traffic Update : दिवे घाटात गुरुवारी तीन तास वाहतूक बंद; रस्ता रुंदीकरणासाठी ब्लास्टिंग

वर्षभरात नाही तर फक्त 40 दिवसांमध्ये पालटणार 'या' राशींचं नशीब ; शनीच्या अस्तामुळे गोल्डन टाईम सुरु !

SCROLL FOR NEXT