police red 
जळगाव

जुगार अड्ड्यावर छापा; २२ जुगाऱ्यांना अटक, ४ लाख ८६ हजारांचा ऐवज जप्त 

रईस शेख

जळगाव : धरणगाव तालूक्यातील पाळधी येथील हॉटेल रेहिणीच्या पाठीमागे चालवल्या जाणाऱ्या जुगार अड्ड्यावर रात्री उशिरा छापा टाकण्यात आला. पथकाने २२ जुगाऱ्यांसह तब्बल ५ लाख ८६ हजार रुपये इतका मुद्देमाल व जुगारचे साहित्य जप्त केले आहे. 

जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या सुचनेवरुन उपविभागात व जिल्‍ह्‍यातील अवैध धंद्यावर छापेमारी साठी परिवीक्षाधीन डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्यासह कर्मचारी संदिप बिऱ्हाडे, प्रकाश कोकाटे, फारुख शेख, अमोल करर्डेकर,विजय अहिरे, अमोल ठाकुर यांचे खास पथक तयार केले आहे. पथकातर्फे अवैध धंद्यावर कारवाईचे सत्र सुरु आहे. या पथकाने मंगळवार(ता.१९)च्या रात्री पाळधीतील हॉटेल रोहिणी गाठली. परिसराची पहाणी करुन मिळालेल्या गुप्त माहितीची खात्री केल्यावर छापा टाकण्यात आला. 

पाच लाखाचा मुद्देमाल
धरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह पथक मदतीला दाखल झाले. घटनास्थळावर २२ जुगारी ५२ पत्त्यांच्या साहिल्याने जुगार खेळतांना आढळून आले असून त्यांच्या कडील रोख रकमेसह जुगाराचे साहित्य आणि मुद्देमाल असा एकुण ५ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. धरणगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी संशयीतांच्या विरुद्ध मुंबई जुगार ॲक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

यांना अटक व गुन्हा दाखल 
नुरा गुलाम पटेल, निसार शहा मस्तान शहा, योगश अरुण ढाके, समाधान अर्जुन माळी, विक्रम श्रीराम सपकाळे, मनोज मगन बाविस्कर, अमोल रामकृष्ण सपकाळे, नारायण रामचंद्र पाटिल, सुनल देवा धनगर, रविंद्र अशोक भोई, पिरन पिंजारी, विलास सुधाकर माळी, योगेश राजेंद्र चौधरी, मुकेश उत्तम महाजन, राजु जगन्नाथ बडगुजर, प्रकाश कोही, नदिम शेख, योगराज हरी पाटिल यांच्यासह इतर अशा एकुण २२ संशयीतांना अटक करण्यात आली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik SIT Press: रुपाली चाकणकरांची चौकशी का नाही? नाशिकमध्ये एसआयटीची पत्रकार परिषद; तेजस्वी सातपुतेंचं स्पष्ट शब्दांत उत्तर

लासलगावच्या हापूसला ‘न्यूयॉर्क’ची हाक; भाभा अणुसंशोधन केंद्र विकिरण प्रक्रियेमुळे पहिल्यांदाच थेट अमेरिकेत निर्यात

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

Arshdeep Singh Girlfriend: अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री? एका टॅटूमुळे समोर आलं मिस्ट्री गर्लचं रहस्य, Viral Post

‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना रखडली, दीड हजार मुलींचे भवितव्य नावाच्या वादात

SCROLL FOR NEXT