mother  mother
जळगाव

संतापजनक..आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; झोपलेली असताना पिशव्या पेटवून फेकल्‍या अंगावर

संतापजनक..आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; झोपलेली असताना पिशव्या पेटवून फेकल्‍या अंगावर

सकाळ डिजिटल टीम

रावेर (जळगाव) : जन्म दिलेला मुलगा हा म्हातारपणाचा आधार आणि कुळाचा दीपक असतो, असे म्हटले जाते. पण आई (Mother) जमीन नावावर करून देत नाही म्हणून तिला जिवंतपणीच जाळून ठार मारण्याचा प्रयत्न एक कुपुत्राने केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील मोरगाव खुर्द येथे शनिवारी (ता. १५) मध्यरात्री घडली. पोलिसांनी संशयितास (Police case) अटक केली असून, याप्रकरणी गुन्हा (Police fir) दाखल करण्यात आला आहे. (trying to burn the mother alive)

मोरगाव खुर्द येथे सुगंताबाई पांडुरंग पाटील (वय ७०) ही महिला राहते. तिला दोन मुले असून, दोन्ही अहमदाबाद (गुजरात) येथे खासगी नोकरी करतात तर मुलीचे लग्न झाले आहे. तिच्या पतीचे सुमारे पंधरा वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तिचा लहान मुलगा नवल किशोर (वय ४२) हा लॉकडाउनच्या काळात घरी मोरगाव खुर्द येथे आला आहे. तो वारंवार दारू पिऊन त्याच्या आईला मारझोड करीत असे. शुक्रवारी रात्री बारा, साडेबाराच्या सुमारास तो दारू पिऊन घरी आला आणि आईजवळ असलेली दोन एकर जमीन विकून टाकून त्याचे पैसे मला एकट्याला दे आणि आईला मिळणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेचे पैसेही दे, असा आग्रह धरला.

पिशव्या पेटवून फेकलेल्‍या आईच्या अंगावर

आईने नकार देताच त्याने घरातील प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करून त्या पेटविल्या आणि आई झोपलेल्या खाटेवर फेकल्या. त्यामुळे सुगंताबाईचे पाय भाजले जाऊन ती गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक मनोहर जाधव यांनी तातडीने मोरगाव खुर्द येथे जाऊन संशयितास ताब्यात घेतले आणि नंतर अटक केली आहे. आपल्या जन्मदात्या आईलाच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याच्या या प्रयत्नांमुळे येथे एकच खळबळ उडाली आहे. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोहर जाधव अधिक तपास करीत आहेत.

याला सोडू नका; आईचा टाहो

खरं म्हणजे मुलगा हा आईसाठी जीव की प्राण असतो. पण दारू पिऊन आईलाही जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या या मुलाला ताब्यात घेतल्यावर या आईने पोलिस उपनिरीक्षक श्री. जाधव यांना विनंती केली की, ‘साहेब, याला सोडू नका, हा खूप त्रास देतो, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असा मुलगा जन्माला आला नसता तर बरे झाले असते' असे दु:खाचे उद्गार सुगंताबाईने काढले. या वेळी उपस्थितांचे मन हेलावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT