Heavy rain home damage sakal
जळगाव

सारे काही उडाले, घर डोळ्यातील अश्रूत बुडाले!

सारे काही उडाले, घर डोळ्यातील अश्रूत बुडाले!

डी. एस. पाटील

धरणगाव (जळगाव) : गेल्या दोन- तीन दिवसांपासून सुरू असलेल्या (Heavy rain Dharangaon house damage) वादळामध्ये घरांचे, पिकांचे गोरगरिबांचे अतोनात नुकसान झाले. एक तर कोरोना आणि त्यात कोरोनाने (Corona death) माणसं नेली आणि हे वादळ घराचं छप्पर अन् भिंती घेऊन जाण्यासाठी आले, साहेब! रात्री वादळी पाऊस असा जोरदार बरसला की माझं घर, माझ्या भिंती साऱ्या साऱ्या चिखल गाळ करून टाकलं, हे सांगताना पिंप्रीच्या दयाबाई राठोड यांचे अश्रू अनावर होत होते. आणि ऐकताना आम्हाला अंगावर काटा येत होता, असे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी सांगितले. (jalgaon-dharangaon-women-house-damage-heavy-rain)

सारे उध्वस्‍त तरीही तिचा प्रामाणिकपणा

तहसिलदार देवरे यांनी दयाबाई यांना विचारले तुम्हाला मुले किती? तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो? तुम्हाला संजय गांधीचा पगार (Sanjay gandhi niradhar yojana) मिळतो का? श्री. देवरे यांनी केलेल्या चौकशीवर त्या म्हणल्या, साहेब, आम्ही गरीब लोक, आमच्याकडे कुठून पैसे येणार? पैसे गेले नाहीत, मात्र डोळ्यादेखत घरात होते नव्हते ते घरासकट उदध्वस्त झाले. मला गरिबीचा पगार पण मिळतो. नाहीतर अशा आपत्तीच्या वेळी बरेच लोक खोटे सांगून देतात की हो, आमचे पैसे पण गेले, पाण्यामध्ये ते पण वाहून गेले. परंतु दयाबाईचा हा प्रामाणिकपणा या आपत्ती काळातही बरंच काही सांगून गेला.

घर दाखवतच सांगत होती कहाणी

गेल्या तीन-चार दिवसांपासून घरांची पडझड होत आहे, यासाठी तहसीलदार विविध गावांमध्ये पाहणी करीत होते. पिंप्री येथे गुरुवारी (ता. ३) दयाबाई तिची कहाणी सांगता सांगता तिच्या घराची अवस्था साहेबांना दाखवत होती. घरामधील सगळं सगळं मातीच्या भिंतीमध्ये दाबलं गेलं होतं. मातीची भिंत असलेले जे काही घर होते, ते देखील खाली खचून गेले होते.

भिजलेल्‍या धान्यावर अश्रूंची धार

दयाबाईने साऱ्या वस्तू, सारे धान्य बाहेर उन्हामध्ये सुकवायला टाकलेलं होतं. हे दाखवताना मात्र तिचे अश्रू अनावर होत होते. मात्र, तहसीलदारांनी तत्काळ आपल्या गाडीतून उदरनिर्वाह कीट काढले. यात महिनाभराचा किराणा, त्याच्यामध्ये अन्नधान्य, गहू, तांदूळ त्यानंतर तेलापासून तर साबणापर्यंत सर्व वस्तू होत्या. दयाबाई नाही म्हणत असतानाही जबरदस्तीने कीट दिले. त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून गेला.

शासकीय नोकरीमध्ये जे काही नियमानुसार चालते, तेच आपण करत असतो. नोकरीमध्ये आपले कर्तव्य प्रत्येकजण बजावत असतोच, परंतु हे असे गोरगरिबांना मदत करून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला आणि त्यांचा चेहरा वाचायला मला खूप आवडते, हेच आपल्या आंतरिक आनंदाचे गमक असेल.

- नितीनकुमार देवरे, तहसीलदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT