Water scarcity
Water scarcity 
जळगाव

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचे गाव; तिथेच पाणी टंचाई

कैलास शिंदे

जळगाव : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व शिवसेनेची बुलंद तोफ असलेले नेते गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव मतदार संघातच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आठ दिवसानी एकदा पाणी पुरवठा होत असल्याने संतप्त महिलांनी आज शिवसेनेची सत्ता असलेल्या पालिकेव हंडा मोर्चा काढला. 
राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील प्रतिनिधित्व करत असलेल्या धरणगाव विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी पाण्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या धरणगाव शहरात तर ऐन हिवाळ्यात आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे संतापलेल्या धरणगावकरांनी आज दुपारी नगरपालिकेवर धडक 'जन आक्रोश हंडा मोर्चा' काढत निष्क्रिय नगरपालिका प्रशासन तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. 

तांत्रिक पाणी टंचाई 
गेल्या दोन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. असे असताना धरणगाव शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघालेला नाही. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना केवळ योग्य नियोजनाअभावी नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होऊ शकत नाही. कृत्रिम पाणीटंचाईला धरणगावकर कंटाळले आहेत. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा यंत्रणेला शिस्त लागत नसल्याने सोमवारी नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला. महिला तसेच आबालवृद्ध डोक्यावर पाण्याचे खाली हंडे घेऊन नगरपालिकेवर धडकले. मोर्चा नगरपालिकेवर धडकल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहराला सुरळीत पाणीपुरवठा केला पाहिजे, अशी एकमुखी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. 

प्रवेशव्दारावर फोडले माठ 
मोर्चेकऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. दैनंदिन कामात महिलांना पाणीटंचाईमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे आहे. दररोज दिवस उगवल्यानंतर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. नगरपालिका नागरिकांना मूलभूत सुविधा देखील पुरवू शकत नसेल तर काय उपयोग? सत्ताधाऱ्यांनी खुर्च्या सोडाव्यात, असा संतप्त प्रतिक्रिया महिलांनी यावेळी व्यक्त केल्या. काही महिलांनी नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाण्याची मातीची भांडी फोडून निष्क्रिय प्रशासनाचा निषेध नोंदवला. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT