jalgaon dpc
jalgaon dpc 
जळगाव

जिल्हा नियोजन समितीवर १८ जणांची विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून नियुक्‍ती

देवीदास वाणी

जळगाव : जिल्हा नियोजन समितीवर विशेष आमंत्रित सदस्य म्हणून १८ जणांची नियुक्ती करण्यात आली. यात जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणी खडसेंसह जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड, डॉ. सुरेश पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा आदींचा समावेश आहे. 

महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) (सुधारणा) अधिनियम, क्रमांक ३०/२०००” मधील कलम ३ चा पोटकलम (३)(दोन) (ब) व ३(३)दोन (क)नुसार व पोटकलम (३) मधील (चार) (फ) येथिल तरतूदीनुसार ही निवड करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निवडीबाबत शासनाकडे पत्र व्यवहार केला होता. 
जळगाव जिल्हा नियोजन समितीवर वरील नमूद नामनिर्देशित तसेच विशेष निमंत्रित यांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत किंवा शासनाकडून सदर नियुक्त्या रद्द होईपर्यंत या पैकी जे अगोदर घडेल, तो पर्यंत अबाधित राहतील. उपसचिव वि.फ. वसावे यांनी या नियुक्त्या केल्या आहे. 

जिल्हा नियोजनाचे ज्ञान नामनिर्देशित सदस्य असे
अॅड. रोहिणी प्रांजल खेवलकर (मुक्‍ताईनगर), शिवराज रावसाहेब पाटील (धानवड, ता.जि.जळगाव), राधेश्‍याम कोगटा (विसनजी नगर), डी.जी.पाटील (धरणगाव). 

नियोजनाचे ज्ञान असलेले विशेष निमंत्रित सदस्य 
मनोहर पाटील (निपाणे, ता.पाचोरा), ॲड. साहेबराव धर्मा सोनवणे (चोपडा), विजय पाटील (टिटवी, ता.पारोळा), वाल्मिक पाटील (जळगाव), नितीन लढ्ढा (मेहरूण), संजय गरूड (शेंदुर्णी, ता.जामनेर), माजी आमदार दिलीप ओंकार वाघ (पाचोरा), मनोहर खैरनार (एसएमआय कॉलेजजवळ), भागवत पाटील (पाडळसे, ता.अमळनेर), डॉ. सुरेश शामराव पाटील (चहार्डी, ता.चोपडा), शेखर सोपान पाटील (सावखेडासीम, पो.दहीगाव, ता.यावल), प्रल्हाद रामदास महाजन (रावेर), रोहिदास पाटील (चाळीसगाव), मनिषा रामचंद्र परब (अमळनेर). 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT