well and died 
जळगाव

पत्‍नी म्‍हणाली फिरायला गेले असतील म्‍हणून सारे झाले निश्चिंत; पण फोन वाजला अन्‌ बसला धक्‍का

आल्हाद जोशी

एरंडोल (जळगाव) : जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या ३५ वर्षीय कर्मचाऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना जवखेडा खुर्द (ता. एरंडोल) शिवारातील नरेंद्र पाटील यांच्या शेतात घडली. हा कर्मचारी विहिरीत पडला की त्यांनी आत्महत्या केली, याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. 
जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई शाखेत लिपिक पदावर कार्यरत असलेले जितेंद्र हेमराज पवार (वय ३५, रा.जवखेडा खुर्द, हल्ली मुक्काम कांचननगर, जळगाव) हे त्यांचे चुलत भाऊ पंडित अधिकराव पवार यांच्याकडे रविवारी आले होते. रात्री जेवण झाल्यानंतर सर्व जण झोपले. 

सकाळी पाहिले तर
सकाळी सातला पंडित पवार यांना जाग आल्यानंतर त्यांना जितेंद्र पवार हे दिसले नाही म्हणून त्यांनी जितेंद्र पवार यांच्या पत्नीशी मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्याबाबत माहिती घेतली. जितेंद्र पवार यांच्या पत्नीने त्यांना सकाळी फिरायला जाण्याची सवय असल्यामुळे ते फिरायला गेले असतील, असे सांगितले. त्यानंतर पंडित पवार हे एरंडोल येथे कामावर आले. 

मोबाईल खणाणला अन्‌
कामावर असताना त्यांना अमोल पाटील यांनी मोबाईलवरून घटनेची माहिती दिली. पंडित पवार हे घटनास्थळी आले. त्या वेळी पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने जितेंद्र पाटील यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी ते मृत झाल्याचे सांगितले. जितेंद्र पवार यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याबाबत पंडित पवार यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजू पाटील तपास करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: सिलेंडरसाठी वाट पाहणं संपलं! इंडेनचा ‘छोटू’ LPG सिलेंडर बाजारात; किराणा दुकानातही सहज मिळणार

माईक हिसकावला आणि स्टेजवरुन हकललं, प्रसिद्ध कॉमेडीयन सुनील पालचा भर कार्यक्रमात अपमान, Viral Video

Central Railway: मध्य रेल्वेवर गोंधळाची परिस्थिती, रुळावर पडून प्रवाशाचा मृत्यू, लोकल सेवा खोळंबली

Latest Marathi News Live Update : - बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाचा फटका; मका पिकाचे मोठे नुकसान

Ashok Kharat case investigation : अशोक खरातची एसआयटीकडून ५ तास चौकशी, VIP, महिला आणि व्यवहारांसाठी वेगवेगळे मोबाईल नंबर; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT