cow 
जळगाव

लेकी, सुनांसारखे गाईचे डोहाळेजेवण

लेकी, सुनांसारखे गाईचे डोहाळेजेवण

सकाळ डिजिटल टीम

एरंडोल (जळगाव) : लेकी, सुनांसारखे गोशाळेतील गाईंवर प्रेम करणाऱ्या माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, माजी नगरसेवक डॉ. नरेंद्र पाटील यांच्या परिवाराने गर्भवती असलेल्या गाईचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. मुक्या प्राण्यांवर परिवारातील सदस्यांप्रमाणेच प्रेम द्यावे, असा संदेश पाटील परिवाराने दिला आहे. (jalgaon-news-erandol-patil-family-cow-like-meal)

माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, माजी नगरसेवक डॉ. नरेंद्र पाटील, निवृत्त शिक्षक डी. एस. पाटील व पाटील परिवारातील सदस्यांनी धरणगाव रस्त्यावरील शेतात गोशाळा सुरू केली आहे. गोशाळेतील सर्व गाईंवर पाटील परिवार परिवारातील सदस्यांप्रमाणे प्रेम करून त्यांची देखभाल करीत असतात. सद्यस्थितीत गोशाळेत पन्नास गाई असून, सर्व गाईना वेळेवर चारा टाकणे, पाणी पाजणे यासह गोशाळा परिसरात स्वच्छता राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. गाय आजारी पडल्यास तिच्यावर तातडीने उपचार केले जातात.

अन्‌ वासरीचे नाव ठेवले ‘राजलक्ष्‍मी’

सेंधवा येथील गायत्री धामाचे प्रमुख श्री. पंडितजी यांनी तीन वर्षांपूर्वी सहा महिने वयाची वासरी गोशाळेस दिली होती. पाटील परिवाराने वासरीचे ‘राजलक्ष्मी’ असे नाव ठेवले. राजलक्ष्मीचा सांभाळ पाटील परिवाराने मुलीसारखा केला. राजलक्ष्मी सात महिन्याची गर्भवती झाल्यामुळे तिचा थाटामाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करून पाटील परिवाराने मुक्या जनावरांप्रती प्रेम व्यक्त करीत समाजासमोर आदर्श उभा केला आहे. गोशाळेत झालेल्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमास गायत्री धामचे प्रमुख पंडितजी, बंटी भाई, पूजा दीदी, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, माजी नगरसेवक डॉ. नरेंद्र पाटील, देविदास बिर्ला, निवृत्त शिक्षक डी. एस. पाटील, ललित पाटील, मुक्ता पाटील, राजेंद्र पाटील, विक्रीकर निरीक्षक भारती पाटील या परिवारातील सदस्यांसह गोसेवक तुळशीराम, नुरालाल पावरा उपस्थित होते. गाईंची सेवा करण्यात मोठे मानसिक समाधान मिळत असल्याचे जयश्री पाटील आणि डॉ. नरेंद्र पाटील यांनी सांगितले. गोशाळेस दररोज शेकडो नागरिक भेटी देऊन गाईंची पाहणी करीत आहेत. पाटील परिवाराने राबविलेल्या सामाजिक उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. जयश्री पाटील आणि डॉ. नरेंद्र पाटील शहरात होणाऱ्या सर्वच सामाजिक उपक्रमास सहकार्य करून सहभागी होत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT