corona free sakal
जळगाव

एरंडोल तालुका कोरोनामुक्तीकडे; केवळ बारा रूग्‍णांवर उपचार

एरंडोल तालुक्याची कोरोनामुक्तीकडे; केवळ बारा रूग्‍णांवर उपचार

सकाळ डिजिटल टीम

एरंडोल (जळगाव) : प्रशासनाने योग्य नियोजन करून लॉकडाउनची (Coronavirus lockdown) कडक अंमलबजावणी केल्यामुळे एरंडोल तालुक्याची कोरोनामुक्तीकडे (Erandol corona free) वाटचाल सुरू आहे. तालुक्याचा कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९६.३८ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, सध्या केवळ बारा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी घट आणि कोरोनावर मात (Jalgaon corona update) करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी शासकीय आदेशांचे पालन केल्यास आठ दिवसांत तालुका कोरोनामुक्त होईल, असा विश्वास प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी व्यक्त केला. (jalgaon-erandol-taluka-corona-free-only-twenteen-active-patient)

तालुक्यात फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रांताधिकारी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अर्चना खेतमाळीस, पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील, डॉ. मुकेश चौधरी, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे यांच्यासह पालिका कर्मचारी, पोलिस कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन केल्यामुळे दोन महिन्याच्या कालावधीत तालुका कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहे.

केवळ बारा रूग्‍ण

सद्य:स्थितीत तालुक्यात केवळ बारा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यात ६ हजार ६९७ रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती, तर ६ हजार ४५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तालुक्यात कोरोना बळींची संख्या २३० वर पोहोचली असून, केवळ बारा रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. यामध्ये पाच रुग्ण गृहविलगीकरणात आहेत तर सात रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुक्यात केवळ बार रुग्ण असल्यामुळे तालुका जवळपास कोरोनामुक्त झाला आहे.

दंडात्‍मक कारवाईचा परिणाम

तालुक्यात मार्चमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. प्रांताधिकारी गोसावी, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली. तसेच विनामास्क फिरणारे व विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केल्यामुळे शहरात रुग्णसंख्या कमी होण्यास मदत झाली.

नियमांचे पालक करा

तालुका कोरोनामुक्त होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी योग्य नियोजन केल्यामुळे तसेच नागरिक, व्यावसायिक यांनीदेखील सहकार्य केल्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यास मदत झाली. आगामी काळात सभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनातर्फे उपाययोजना केल्या जात आहेत.नागरिकांनी शासकीय आदेशांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी गोसावी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT