encroached houses 
जळगाव

अतिक्रमित घरांनाही लागणार घरपट्टी 

समीर तडवी

फैजपूर (जळगाव) : शहरातील हद्दीतील सरकारी व पालिका मालकीच्या, तसेच पालिका मालकीच्या जागेवरील अतिक्रमित घरांना (झोपडपट्टी) घरपट्टी लावण्यासाठी पालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. फैजपूर पालिकेच्या शुक्रवारी (ता. ५) झालेल्या सर्वसाधारण सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. 
फैजपूर शहराच्या उत्तरेस असलेल्या हद्दीतील सरकारी सिटी सर्व्हे क्रमांक ३७३१ व ३७३३ या जागेवर १९९५ पासून अतिक्रमित घरांची झोपडपट्टी वसली आहे, तर पालिका मालकीच्या गट क्रमांक ३७७९ वरदेखील अतिक्रमित घरे आहेत. या अतिक्रमित घरांना (झोपडपट्टीला) शहरातील स्वतःच्या मालमत्ताधारकांप्रमाणे पालिकेतर्फे अनेक वर्षांपासून फैजपूर पालिका अत्यावश्यक मूलभूत नागरी सुविधा पुरवित आहे. केवळ अतिक्रमणधारकांनी घेतलेल्या नळ संयोजनापोटी पाणीपट्टी कर पालिकेला मिळतो. एकंदरीत या अतिक्रमित घरांना (झोपडपट्टीला) पुरविण्यात येत असलेल्या सोयीसुविधांवर लागणारा खर्च पालिकेला करावा लागतो. त्यासाठी या अतिक्रमित घरांना पालिकेतर्फे पुरविल्या जाणाऱ्या नागरी सुविधांपोटी पालिकेला उत्पन्न मिळावे, यासाठी घरपट्टी लावण्याच्या निर्णयास पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे. 

सर्व्हेनंतर मालमत्‍ता कराची आकारणी
अतिक्रमित घरांच्या (झोपडपट्टीला) घरपट्टी आकारणीचा यापूर्वी सर्व्हे करण्यात आला आहे. आता पुन्हा हा सर्व्हे करण्यात येऊन अतिक्रमित घरांची घरपट्टी कर आकारणी करण्याच्या पालिकेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्व्हे झाल्यानंतर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येणार आहे. जरी घरपट्टी कराची आकारणी झाली तरी हे अतिक्रमण नियमित होणार नाही. या अतिक्रमित (झोपडपट्टीला) पालिका पुरवित असलेल्या नागरी सुविधांपोटी घरपट्टी कर आकारणी होणार आहे, असे पालिकासूत्रांनी सांगितले आहे. 

उत्पन्नात होणार वाढ 
अतिक्रमित झोपडपट्टीधारक वर्षानुवर्षे रहिवास करीत आहेत. त्यांना पालिका अनेक वर्षांपासून अत्यावश्यक नागरी सुविधा पुरवित असली तरी पालिकेने अद्यापही मालमत्ता कर आकारणी केली नव्हती. मात्र, आता या अतिक्रमित घरांना (झोपडपट्टी) घरपट्टी लावण्यासाठी पालिकेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. या माध्यमातून पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. 

पालिका या अतिक्रमित घरांना मूलभूत नागरिक सुविधा पुरवित आहे. या उद्देशाने या अतिक्रमित घरांना घरपट्टी मालमत्ता कर आकारणी केली जाणार आहे. अतिक्रमण हे नियमित झाले, असे समजण्यात येणार नाही किंवा नियमित होणार नाही. 
-किशोर चव्हाण, मुख्याधिकारी, फैजपूर पालिका 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

karj mafi 2026 : कर्जमाफीची घोषणा झाली... पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी? अंमलबजावणीवर मोठे प्रश्न उपस्थित

Mumbai Local Megablock: रविवारी सर्व रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, अनेक लोकल रद्द; कसे असेल वेळापत्रक?

Live Updates Marathi : खड्डेमय रस्त्यांचा आणखी एक बळी, ३९ दिवसांच्या झुंजीनंतर आजींचा मृत्यू

Brazil Football: ब्राझीलचा फुटबॉल संघ भारतात येणार? कोलकात्यात रंगू शकतो मेगा सामना; रिपोर्टने वाढवल्या चाहत्यांच्या आशा

PM Modi Latest Video : 'या' एका व्हिडिओमुळे इंस्टाग्रामवर पंतप्रधान मोदी ट्रेंडिंग; १२ तासात वाढले १.१ मिलियन फॉलोअर्स

SCROLL FOR NEXT