gharkul scheme 
जळगाव

बोगस माहिती भरून लाटले घरकुल 

सकाळवृत्तसेवा

यावल (जळगाव) : तालुक्यातील सौखेडासीम ग्रामपंचायतीमार्फत रमाई आवास योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांनी दिशाभूल करणारी माहिती प्रशासनाकडे सादर केली असून, या सर्व प्रकाराची लेखी तक्रार गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनील नथ्थू भालेराव यांनी केली आहे. तीन दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश येथील गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील यांनी दिले आहेत. 
या संदर्भात सौखेडासीम येथील सुनील भालेराव यांनी येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की सौखेडासीम येथील अभिजित दिलीप साळवे व अशोक प्रकाश साळवे या दोघांचे अद्याप लग्न झालेले नसून ते शिक्षण घेत आहेत. असे असताना या दोघांच्या नावाने २०१९-२० या वर्षात ग्रामपंचायतीच्या वतीने रमाई आवास योजनेचा लाभ घेत आहे. 

एकत्रित कुटूंबाचा मुद्दा हेरला
एकत्रित कुटुंबात राहात असताना त्यांना घरकुलाची गरज काय? यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून या दोघांच्या घरकुलांना मान्यता मिळाली कशी? हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. या दोघांचे रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल तत्काळ रद्द करावे, अशी तक्रार सुनील भालेराव यांनी केली होती. या तक्रारीची तत्काळ दखल घेत गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील यांनी १९ मार्चला सौखेडासीम ग्रामपंचायतीला पत्र पाठवून रमाई आवास योजनेचा लाभ घेणाऱ्या अभिजित साळवे व अशोक साळवे या दोघा लाभार्थ्यांचे रेशनकार्ड वेगवेगळे आहेत का? त्यांच्याकडे स्वत:ची जागा आहे का? व ते जर एकत्र कुटुंबात रहिवास करीत असतील तर त्यांच्या कुटुंबाने यापूर्वी घरकुल योजनेचा किंवा दुरुस्तीचा लाभ घेतला आहे का? याबाबतचा सुधारित अहवाल तीन दिवसांत पंचायत समितीकडे लेखी स्वरूपात गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावा, असे म्हटले आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील काय निर्णय घेतात, हे विशेष आहे. दरम्यान, या संदर्भात तक्रारदार भालेराव यांनी, या प्रकरणाची तत्काळ चौकशी न झाल्यास आपण यावल पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा एका पत्रकान्वये दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT